Koffee With Karan 8 : अनन्या पांडेबरोबरच्या डेटिंगच्या चर्चांवर आदित्य रॉय कपूरचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, "मला सिक्रेट..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 12:52 PM2023-12-11T12:52:33+5:302023-12-11T12:53:22+5:30

'कॉफी विथ करण ८'मध्ये आदित्यने अनन्या पांडेबरोबरच्या रिलेशनशिपबाबतही भाष्य केलं आहे.

koffee with karan 8 aditya roy kapur talk about dating romours with ananya panday | Koffee With Karan 8 : अनन्या पांडेबरोबरच्या डेटिंगच्या चर्चांवर आदित्य रॉय कपूरचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, "मला सिक्रेट..."

Koffee With Karan 8 : अनन्या पांडेबरोबरच्या डेटिंगच्या चर्चांवर आदित्य रॉय कपूरचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, "मला सिक्रेट..."

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'चा ८वा सीझन प्रचंड गाजत आहे. या सीजनलाही लोकप्रियता मिळत आहे. 'कॉफी विथ करण ८'च्या आगामी भागात बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेते सहभागी होणार आहे. आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावणार आहेत. याचा प्रोमो व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओत आदित्य आणि अर्जुन करण जोहरच्या प्रश्नांना मिश्किलपणे उत्तर देताना दिसत आहेत. 

'कॉफी विथ करण ८'मध्ये आदित्यने अनन्या पांडेबरोबरच्या रिलेशनशिपबाबतही भाष्य केलं आहे. या प्रोमो व्हिडिओत करण आदित्यला अनन्या बरोबरच्या डेटिंगच्या चर्चांबाबत प्रश्न विचारतो. करणच्या या प्रश्नाला आदित्य रॉय कपूर अगदी स्मार्टपणे उत्तर देतो. "तू अनन्या पांडेला डेट करत आहेस, अशा चर्चा आहेत", असं करण आदित्य कपूरला विचारतो. यावर उत्तर देत तो म्हणतो, "मला सिक्रेट विचारू नको, मी खोटं बोलणार नाही."

दरम्यान, आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. अनन्या आणि आदित्यचे काही फोटोही व्हायरल झाले होते. 'कॉफी विथ करण'मध्ये अनन्याने देखील डेटिंगच्या चर्चांवर भाष्य केलं होतं. "आम्ही चांगले मित्र आहोत", असं अनन्या म्हणाली होती. त्यानंतर अनन्याचा 'कपूर' असा टॅग असलेला टीशर्ट घातलेला व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर अनन्या-आदित्यच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता पुन्हा आदित्यने यावर भाष्य केल्याने त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. 
 

Web Title: koffee with karan 8 aditya roy kapur talk about dating romours with ananya panday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.