​जाणून घ्या, भारतात घालवलेल्या दिवसांबद्दल काय बोलली यूलिया?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 11:22 IST2016-11-18T11:22:53+5:302016-11-18T11:22:53+5:30

सलमान खान आणि त्याची कथित गर्लफ्रेन्ड यूलिया वेंटर यांच्याबद्दल खूप चर्चा झाल्या. सलमान व यूलिया लग्नबंधनात अडकणार इथपासून तर ...

Know what happened in India, what did Ulia talk about? | ​जाणून घ्या, भारतात घालवलेल्या दिवसांबद्दल काय बोलली यूलिया?

​जाणून घ्या, भारतात घालवलेल्या दिवसांबद्दल काय बोलली यूलिया?

मान खान आणि त्याची कथित गर्लफ्रेन्ड यूलिया वेंटर यांच्याबद्दल खूप चर्चा झाल्या. सलमान व यूलिया लग्नबंधनात अडकणार इथपासून तर दोघांच्याही ब्रेकअपपर्यंत. अर्थात सलमान व यूलिया दोघेही या चर्चांवर खुलासे करण्याच्या फंदात पडले नाहीत. त्यापेक्षा त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या चर्चाही वाढल्या. पण यानंतर व्हिसाची मुदत संपल्याने यूलिया मायदेशी परतली आणि इकडे सलमान एकटा पडला. यूलियाच्या आठवणीने सलमान व्याकूळ झाल्याची बातमी मध्यंतरी आली. पण सलमानने नेहमीप्रमाणे यावर न बोलणेच पसंत केले. पण कदाचित यूलिया तशी नाहीय. भारतातील तिचा अनुभवाबद्दल तिला भरभरून बोलायचेय आणि तशी ती बोललीही. होय, एका रोमानियन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत यूलियाने भारतातील तिचा अनुभव शेअर केला. मी भारतात जावून हिंदी गाणे गायला शिकल्याचे तिने सांगितले. भारत पूर्णपणे वेगळा आहे. भारतातील लोकांची मानसिकता, तेथील लोक, भारताची संस्कृती सगळे काही वेगळे आहे. तिथे फारसी प्रायव्हर्सी नाही. एकाच घरात अनेक लोक राहत असलेले तिथे दिसतात,असे यूलियाने या मुलाखतीत सांगितले. कदाचित ती सलमानच्या घराबद्दल बोलत असावी. भारतात सलमानच्या कुटुंबासोबत यूलियाने बराच वेळ घालवला. सल्लूची आई आणि बहिणींसोबत यूलियाची चांगलीच गट्टी जमली होती. भारतात जाण्यासाठी थिएटर करिअरवर पाणी सोडायला मी तयार झाली. भारतात गेल्याने थिएटरचा अनेक संधी हुकणार होत्या. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले, असेही तिने सांगितले. एकंदर काय, तर भारतात येण्यासाठी यूलिया आतूर होती आणि कदाचित अजूनही आहे. शेवटी सलमानला सहजी विसरणे सोपे नाहीच!!

 


Web Title: Know what happened in India, what did Ulia talk about?