Throwback Video:...म्हणून बॉलिवूड स्टार्ससोबत लग्न केलं नाही;माधुरी दीक्षित आणि जूही चावला यांनी सांगितलं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 09:00 IST2021-11-24T09:00:00+5:302021-11-24T09:00:00+5:30

बॉलिवूडमध्ये कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. एकत्र काम ...

Know the reason why Madhuri Dixit & Juhi Chawla didn't marry person from acting career, check here | Throwback Video:...म्हणून बॉलिवूड स्टार्ससोबत लग्न केलं नाही;माधुरी दीक्षित आणि जूही चावला यांनी सांगितलं गुपित

Throwback Video:...म्हणून बॉलिवूड स्टार्ससोबत लग्न केलं नाही;माधुरी दीक्षित आणि जूही चावला यांनी सांगितलं गुपित

बॉलिवूडमध्ये कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. एकत्र काम करणाऱ्या  पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत.मात्र असेही कलाकार आहेत ,ज्यांचे जोडीदार हे अभिनय क्षेत्रातले नसून वेगळ्या क्षेत्रातील आहेत. यात माधुरी दीक्षित आणि जुही चावला या दोघांनीही जोडीदार म्हणून दुसऱ्याच क्षेत्रातत काम करणाऱ्यांनी निवड केली. त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या चाहत्यांनाही वाटले असावे की ते एखाद्या स्टारशीच लग्न करतील, पण त्यांनी असे केले नाही. कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीशी लग्न न करता दुसऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या जोडीदारासह ते लग्नबंधनात अडकले.आज त्यांचा सुखाने संसार सुरु आहे. 


या दोघींचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.'कॉफी विथ करण' या शोमध्ये जेव्हा जुही माधुरीने हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी त्यांच्या जोडीदार निवडीबद्दल उत्तर दिले होते.या दोघींनीही करणने विचारलेल्या प्रश्नाची मनमोकळेपणाने उत्तरं दिली होती. 

जूही चावलाने 1995 मध्ये उद्योगपती जय मेहतासोबत लग्न केले होते, तर माधुरी दीक्षितने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले होते. करण जोहरने त्याच्या शोमध्ये माधुरी आणि जुहीला विचारले होते की, तुम्ही दोघांनी बॉलिवूडच्या दिग्गज स्टार्ससोबत काम केले आहे, पण बॉलिवूडच्या बाहेरील व्यक्तीसोबत लग्न केले आहे, असे का?


करणच्या प्रश्नावर माधुरी म्हणाली, 'मी शाहरुख आणि सलमानसोबत खूप काम केले आहे,आमिरसोबत दोन चित्रपट केले आहेत. पण मला लग्न करण्याइतपत कोणीही जोडीदार म्हणून आवडला नाही. शेवटी माझा नवरा हाच माझा खरा हिरो आहे. तर जुही म्हणाली होती की, 'जय माझ्यासाठी फुले, कार्ड आणि भेटवस्तू पाठवायचा, मी त्याच्याकडे आकर्षित झाले.' पुढे जूही गंमतीने म्हणाली, 'माझ्यापेक्षा जास्त वेळा आरशात पाहतो अशा व्यक्तीला मी माझ्या नवऱ्याच्या रुपात पाहू शकली असती असे मला वाटत नाही' जुहीचे ऐकून माधुरी आणि करणही हसू आवरु शकले नव्हते.

Web Title: Know the reason why Madhuri Dixit & Juhi Chawla didn't marry person from acting career, check here