Priyanka Chopra-Nick Jonas Honeymoon : ओमाननंतर प्रियांका चोप्रा-निक जोनासची 'या' देशाला हनीमूनसाठी पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 12:40 IST2018-12-15T12:20:23+5:302018-12-15T12:40:09+5:30

लवकरच प्रियांका मुंबईत देखील दोन रिसेप्शन देणार आहे. ईशा अंबानीच्या प्री-वेडिंग सेरेमनीनंतर दोघे मिनी हनीमूनला ओमानाला जाऊन आले आहेत.   

know the honeymoon destination of priyanka chopra and nick jonas | Priyanka Chopra-Nick Jonas Honeymoon : ओमाननंतर प्रियांका चोप्रा-निक जोनासची 'या' देशाला हनीमूनसाठी पसंती

Priyanka Chopra-Nick Jonas Honeymoon : ओमाननंतर प्रियांका चोप्रा-निक जोनासची 'या' देशाला हनीमूनसाठी पसंती

ठळक मुद्देहनीमूनवरून परतल्यानंतर प्रियांका आपला आगामी सिनेमा 'द स्काय इज पिंक’चे  शूटिंग पूर्ण करणार आहे.नुकतेच दोघे मिनी हनीमूनसाठी ओमानाला जाऊन आले आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी १ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका व निक यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.यानंतर २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाले. त्यानंतर प्रियांकाने दिल्लीत रिसेप्शनदेखील दिले. लवकरच प्रियांका मुंबईत देखील दोन रिसेप्शन देणार आहे. ईशा अंबानीच्या प्री-वेडिंग सेरेमनीनंतर दोघे मिनी हनीमूनला ओमानाला जाऊन आले आहेत.   


नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक न्यू इअरच्या आधी हनीमूनसाठी रवाना होणार आहेत. प्रियांका-निक 28 डिसेंबरला स्वित्झर्लंड जाणार आहेत. प्रियांका आणि निक 10 जानेवारी 2019 ला स्वित्झर्लंडहुन परतणार आहेत.

हनीमूनवरून परतल्यानंतर प्रियांका आपला आगामी सिनेमा 'द स्काय इज पिंक’चे  शूटिंग पूर्ण करणार आहे. त्यानंतर ती लगेच संजय लीला भन्साळींच्या सिनेमात दिसणार आहे. भन्साळींच्या सिनेमात प्रियांका ‘लेडी डॉन’ बनणार असल्याचे कळते.प्रियांकाचा हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरातील मॅडम गंगुबाईच्या ख-या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. हुसैन जैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्विन आॅफ बॉम्बे’ या पुस्तकात गंगूबाईची माहिती दिली आहे. चित्रपटाचे कथानक यावर आधारित असेल. आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे या  यापूर्वी ‘सात खून माफ’ या सिनेमात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती.  
 

Web Title: know the honeymoon destination of priyanka chopra and nick jonas