एक सिनेमा केला आणि तो गायब झाला..! आता कुठे आहे ‘तुम से अच्छा कौन है’ चा ‘हा’ हिरो?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 08:00 AM2022-01-11T08:00:00+5:302022-01-11T08:00:13+5:30

होय, 2002 मध्ये ‘तुम से अच्छा कौन है’ या चित्रपटात नकुल दिसला. त्याच्या सुंदर चेहऱ्याने तरूणींना भुरळही घातली. पण का कोण जाणे, नकुलचा दुसरा चित्रपट आलाचं नाही....

know about tumse achcha kaun hai fame bollywood actor nakul kapur | एक सिनेमा केला आणि तो गायब झाला..! आता कुठे आहे ‘तुम से अच्छा कौन है’ चा ‘हा’ हिरो?

एक सिनेमा केला आणि तो गायब झाला..! आता कुठे आहे ‘तुम से अच्छा कौन है’ चा ‘हा’ हिरो?

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये अनेकजण येतात आणि येतात तसेच हरवतात. चार-दोन चित्रपटात झळकले आणि नंतर बॉलिवूडमधून गायब झालेत, अशांची यादी मोठी आहे. बॉलिवूडचा एक अभिनेताही असाच. तो फक्त एका चित्रपटात दिसला आणि यानंतर इंडस्ट्रीतून कायमचा बाद झाला. हा अभिनेता कोण तर नकुल कपूर (Nakul Kapur). 

होय, 2002 मध्ये ‘तुम से अच्छा कौन है’ (Tumse Achcha Kaun Hai) या चित्रपटात नकुल दिसला. त्याच्या सुंदर चेहऱ्याने तरूणींना भुरळही घातली. पण का कोण जाणे, नकुलचा दुसरा चित्रपट आलाचं नाही. आता तर नकुल पूर्णपणे लोकांच्या विस्मृतीत गेलायं. बॉलिवूडवर मनापासून प्रेम करणारे चाहतेही त्याला विसरले आहेत.

‘तुम से अच्छा कौन है’ मधून नकुलने बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात आरती छाबरिया आणि किम शर्मा  लीड रोलमध्ये  होत्या. या चित्रपटाने नकुल एका रात्रीत स्टार झाला. चित्रपटातील गाणी इतकी गाजली की, नकुल स्टार लाखो तरूणींच्या ‘दिलाची धडकन’ बनला. 

पण हे स्टारडम नकुलला टिकवता आलं नाही. ‘तुम से अच्छा कौन है’ थेटरमधून खाली उतरला आणि तशा नकुलच्या चर्चाही हळूहळू थांबल्या. ना चर्चा, ना नवा सिनेमा...  ‘तुम से अच्छा कौन है’नंतर नकुलला दुस-या कोणत्याच सिनेमाच्या ऑफर्स आल्या नाहीत.

यानंतर तर नकुल बॉलिवूडमधून पुरता गायब झाला. तो कुठे आहे, काय करतो, याची कोणालाच खबर नव्हती. त्याच्यावर प्रेम करणारे चाहते होते. त्यांनी इंटरनेटवर नकुलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण नकुलचा काहीच पत्ता लागेला. यानंतर अचानक एक दिवस नकुलच्या मृत्यूचीच बातमी पसरली.  ही बातमी नकुलच्या कानावर गेली आणि अचानक नकुल जगासमोर आला. मी जिवंत आहे, असं त्यानं सांगितलं. 
 
आज नकुल काय करतोय, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तो सध्या कॅनडात आहे. येथे तो एक योगा टीचर आहे. कॅनडात तो डिवाईन लाईट नामक योग केंद्र चालवतो.  

Web Title: know about tumse achcha kaun hai fame bollywood actor nakul kapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.