काय सांगता? दीपिका पादुकोणला आधीच झाला होता ‘कोरोना’चा पूर्वाभास!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 10:18 AM2020-04-21T10:18:49+5:302020-04-21T10:18:54+5:30

म्हणून ऐनवेळी रद्द केला प्लान

know about the power of sixth sense of deepika padukone saved this time from corona-ram | काय सांगता? दीपिका पादुकोणला आधीच झाला होता ‘कोरोना’चा पूर्वाभास!!

काय सांगता? दीपिका पादुकोणला आधीच झाला होता ‘कोरोना’चा पूर्वाभास!!

googlenewsNext
ठळक मुद्देशकुन बत्राच्या या चित्रपटानंतर दीपिका ‘83’ या सिनेमातही झळकणार आहे. शिवाय ‘द इंटर्न’ या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 सहावे इंद्रिय असलेल्या व्यक्ती अनेकदा अचंबित करतात. यालाच सिक्स्थ सेन्स म्हणतात. सिक्स्थ सेन्स असलेल्या व्यक्तिंना भविष्यात घडणा-या घटनांचे फार आधीच संकेत मिळतात. अर्थात त्यांना पूर्वाभास होऊ लागतात. बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिलाही पूर्वाभास होतात. होय, रणबीर कपूर आपल्याला प्रेमात धोका देणार आहे, याचा आभास दीपिकाला आधीच झाला होता, असे म्हणतात. याचमुळे तिने रणबीरला अगदी रंगेहात पकडले होते. आता हेच बघा ना, कोरोनाचे संकटामुळे जगावर उद्भवलेल्या स्थितीचा आभार दीपिकाला म्हणे आधीच झाला होता. म्हणून तिने श्रीलंकेत जाण्याचा निर्णय ऐनवेळी बदलला होता.

होय, भारतात लॉकडाऊन होण्याच्या काही दिवसआधी दीपिका एका चित्रपटासाठी कॅनडा व श्रीलंकेच्या टूरवर जाणार होती. हा सिनेमा शकुन बत्रा दिग्दर्शित करणार आहेत. यात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी व अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे.

 दीपिकाच्या सूत्रांच्या मते, गेल्या 18 मार्चला दीपिका श्रीलंकेत पोहोचणार होती. याचदिवशी शुटींगला सुरुवात होणार होती. यानंतर तिथून ती कॅनडाला रवाना होती. मात्र श्रीलंकेला निघण्याच्या पाच दिवस आधी दीपिकाला जणू विचित्र आभास झाला. यानंतर तिने स्वत: चित्रपटाचा निर्माता करण जोहरला फोन केला. मला काही ठीक वाटत नाहीये, कदाचित सर्व लोक श्रीलंकेत अडकून पडणार आहेत, असे तिने करणला सांगितले आणि शूटींग शेड्यूल रद्द केले. तिच्या पश्चात शकुन बत्रा श्रीलंकेसाठी निघणार होते. पण दीपिकाने त्यांनाही न जाण्यासाठी राजी केले. दीपिकाला पूर्वाभास होतात, याचे अनेक किस्से बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तिला झालेल्या या पूर्वाभासाची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये सर्वत्र आहे.

शकुन बत्रा यांच्या या आगामी चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. पण ही एक प्रेमकहाणी असल्याचे कळतेय. शकुन बत्राच्या या चित्रपटानंतर दीपिका ‘83’ या सिनेमातही झळकणार आहे. शिवाय ‘द इंटर्न’ या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: know about the power of sixth sense of deepika padukone saved this time from corona-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.