अथिया शेट्टीला ‘प्यार में धोका’? के.एल. राहुलच्या आयुष्यात नवी बाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 14:01 IST2021-05-24T13:57:46+5:302021-05-24T14:01:28+5:30

Viral Post :  होय, राहुलच्या आयुष्यात नव्या हिरोईनची एन्ट्री झाल्याचे मानलं जातंय. पण आता...

kl rahul comments on actress sonam bajwa photo fan asks about athiya shetty see viral post | अथिया शेट्टीला ‘प्यार में धोका’? के.एल. राहुलच्या आयुष्यात नवी बाला?

अथिया शेट्टीला ‘प्यार में धोका’? के.एल. राहुलच्या आयुष्यात नवी बाला?

ठळक मुद्देअथियाशेट्टी हिने ‘हिरो’ या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला.

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू के. एल. राहुल (KL Rahul) आणि सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty)यांचे नाते आताश: कुणापासूनही लपून राहिलेले नाही. म्हणायला राहुल व अथियाने अद्याप जाहिरपणे प्रेमाची कबुली दिलेली नाही. पण सोशल मीडियावरच्या दोघांच्या पोस्ट पाहता आता काहीही सांगण्यासारखे शिल्लक उरलेले नाही.
पण तूर्तास के. एल. राहुल दुस-या एका अभिनेत्रीमुळे चर्चेत आहे. होय, राहुलच्या आयुष्यात नव्या हिरोईनची एन्ट्री झाल्याचे मानलं जातंय. आता कशावरून तर या हिरोईनच्या पोस्टवर के.एल.ने केलेल्या कमेंटवरून.

ही नवी हिरोईन कोण तर पंजाबी मॉडेल व अभिनेत्री सोनम बाजवा.  ‘सूर्य मावळतोय आणि मी तुझ्याबद्दल विचार करतेय,’ अशी एक पोस्ट सोनमने शेअर केली होती. सोबत एक फोटोही पोस्ट केला होता. यावर के.एल. राहुलने कमेंट केली आणि त्याची ही कमेंट वाचून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला़ होता. ‘बस एक कॉल दूर हूं’, असे राहुलने सोनमच्या या पोस्टवर लिहिले होते.

त्याची ही कमेंट वाचून साहजिकच के. एल. राहुल अथियाला धोका तर देत नाहीये ना? असा सवाल चाहत्यांना पडला आहे.
 के. एल. राहुलची कमेंट पाहून आथिया आणि के. एल. राहुल यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

अथियाशेट्टी हिने ‘हिरो’ या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. ‘मोतीचूर चकनाचूर’ हा तिचा तिसरा सिनेमाही सुपरडुपर फ्लॉप झाला. तिसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका बुडताना दिसतेय. पण दुसरीकडे अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहे. 

Web Title: kl rahul comments on actress sonam bajwa photo fan asks about athiya shetty see viral post