/>केआरके नावाने ओळखला जाणारा कमाल आर खान त्याच्या रोज नव्या वादग्रस्त tweetसाठी जाणला जातो. बॉलिवूडमधील नट-नट्यांवर वादग्रस्त, आक्षेपार्ह tweet करणे हा त्याचा आवडता धंदा. आता त्याने बिपाशा बसू हिचा पती करण सिंह ग्रोवर याला टार्गेट केलेय. हे tweet गमतीशीर आहे, सोबतच करणसाठी एक टोमणाही आहे. बिपाशा व करण गत ३० एप्रिलला लग्नबंधनात अडकले. हाच धागा पकडून केआरकेने करणवर tweet केले आहे. करण हा भारतातील सगळ्यात सेक्युलर(धर्मनिरपेक्ष व्यक्ति) आहे. त्याची पहिली पत्नी शिख, दुसरी ख्रिश्चन आणि आता तिसरी हिंदू आहे, असे tweet केआरकेने केले आहे. आता तुम्हीही केआरकेच्या या tweetशी सहमत असाल. कारण बिपाशाचे हे पहिले मात्र करणचे तिसरे लग्न आहे. करणने सर्वप्रथम टीव्ही को-स्टार श्रद्धा निगम हिच्याशी लग्न केले होते. मात्र हा विवाह उणापुरा दहा महिनेही टिकला नाही. यानंतर त्याने टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटशी लग्न केले. हा विवाह सुमारे दोन वर्षे टिकला. आता करणने बिपाशाला पत्नी केले आहे. अशास्थितीत केआरकेचा हा टोमणा करणला किती झोंबतो, ते बघूयात!!