सलमान खानचा KKBKKJ लवकरच करणार 100 कोटींच्या कल्बमध्ये शानदार एंट्री, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 18:04 IST2023-04-26T17:59:33+5:302023-04-26T18:04:35+5:30

'भाई'चे स्टारडम चाहत्यांना थिएटरमध्ये खेचण्यात यशस्वी होताना दिसत आहे.

kkbkkj day 5 collection salman khan pooja hegde kisi ka bhai kisi ki jaan movie to soon enter 100-crore club know total collection | सलमान खानचा KKBKKJ लवकरच करणार 100 कोटींच्या कल्बमध्ये शानदार एंट्री, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा

सलमान खानचा KKBKKJ लवकरच करणार 100 कोटींच्या कल्बमध्ये शानदार एंट्री, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) नुकत्याच रिलीज झालेल्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून आपला जलवा दाखवत आहे. ईदच्या मुहुर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाची पहिल्या दिवशीची कामगिरी निराशाजनक होती. मात्र वीकेंडला सिनेमाने वेग धरला आणि बॉक्सऑफिसवर कोटींची कमाई केली. समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत नसला तरी 'भाई'चे स्टारडम चाहत्यांना थिएटरमध्ये खेचण्यात यशस्वी होताना दिसत आहे.

फरहाद सामजी दिग्दर्शित 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ १३ कोटी रुपयांची कमाई केली होती. सिनेमाची ओपनिंग खराब आहे हे पाहताच सिनेमात आपटणार का अशी शंका अनेकांना आली. मात्र २२ एप्रिल ईदनिमित्ताने सिनेमागृहात मोठी गर्दी उसळली. परिणामी फिल्मने दुसऱ्या दिवशी तब्बल २५ कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी रविवारी सिनेमाने 26.25 कोटींचे कलेक्शन केले आहे. 

दुसरीकडे, सोमवारी चित्रपटाने केवळ 10 कोटींचा बिझनेस केला.  जर आपण चित्रपटाच्या पाचव्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोललो तर, सलमान खान आणि पूजा हेगडेचा हा चित्रपट केवळ 6.12 कोटींचा आकडा पार करू शकला. या चित्रपटाचे आतापर्यंत एकूण 84.46 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे. हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील होण्यापासून काही पावले दूर आहे.

याचाच अर्थ सलमानची जादू अजून कायम आहे. सिनेमात सलमान सोबत पूजा हेगडेची जोडी जमली आहे. तर व्यंकटेश, जगपति बाबू, विजेंदर सिंह, शहनाज गिल, पलक तिवारी, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम यांचीही मुख्य भूमिका आहे.

Web Title: kkbkkj day 5 collection salman khan pooja hegde kisi ka bhai kisi ki jaan movie to soon enter 100-crore club know total collection