'किसी का भाई...' चा ट्रेलर प्रदर्शित, सलमान खानचा शहनाझ गिलला सल्ला, म्हणाला, 'मूव्ह ऑन..'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 09:31 AM2023-04-11T09:31:45+5:302023-04-11T09:33:29+5:30

शहनाझ गिल बिग बॉसमुळे लोकप्रिय झाली. या शोमध्ये तिची आणि सिद्धार्थ शुक्लाची जोडी जमली होती.

kisi ka bhai kisi ki jaan trailer released salman khan gives advice to shehnaaz gill to move on | 'किसी का भाई...' चा ट्रेलर प्रदर्शित, सलमान खानचा शहनाझ गिलला सल्ला, म्हणाला, 'मूव्ह ऑन..'

'किसी का भाई...' चा ट्रेलर प्रदर्शित, सलमान खानचा शहनाझ गिलला सल्ला, म्हणाला, 'मूव्ह ऑन..'

googlenewsNext

सलमान खानचा (Salman Khan) आगामी 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. कालच सिनेमाचा ट्रेलर लॉंच पार पडला. या सिनेमात मोठी स्टारकास्ट आहे. सलमान खान, पूजा हेगडे, भूमिका चावला, शहनाझ गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम असे अनेक कलाकार आहेत. या सर्वच कलाकारांच्या उपस्थितीत ट्रेलर लॉंच झाला. बिग बॉस फेम शहनाझ गिलचा (Shehnaaz Gill) हा पहिलाच सिनेमा आहे. या पहिल्या सिनेमासाठी सलमानने शहनाझला 'मूव्ह ऑन' असा सल्ला दिला आहे.

शहनाझ गिल बिग बॉसमुळे लोकप्रिय झाली. या शोमध्ये तिची आणि सिद्धार्थ शुक्लाची जोडी जमली होती. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही त्यांचं नातं टिकून होतं. मात्र 2021 मध्ये सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. यामुळे शहनाझ अक्षरश: कोसळली होती. आता शहनाझ सावरली असून अभिनयात पदार्पणही करत आहे. ट्रेलर लॉंचवेळी होस्टने शहनाझला विचारले, 'पहिल्या सिनेमासाठी नर्व्हस आहेस का?' यावर शहनाझ काही म्हणणार त्याआधीच सलमान म्हणाला, 'मी तर म्हणतो मूव्ह ऑन कर जाओ, मूव्ह ऑन'

सलमानचा हा सल्ला ऐकून शहनाझ आधी थोडी भावूक होते. यानंतर ती म्हणते, 'नाही मी अजिबातच नर्व्हस नाहीए'. 'किसी का भाई किसी की जान' 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. ट्रेलर चाहत्यांच्याल पसंतीस पडला असून आता सर्वांना चित्रपटाची उत्सुकता आहे. 

Web Title: kisi ka bhai kisi ki jaan trailer released salman khan gives advice to shehnaaz gill to move on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.