बॉक्स ऑफिसवर नाही चालली सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ची जादू, पहिल्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:45 IST2023-04-22T16:40:52+5:302023-04-22T16:45:17+5:30

'किसी का भाई किसी की जान' सिनेमा रिलीज होताच सल्लू भाईच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पाेहोचला आहे.

kisi ka bhai kisi ki jaan box office salman khan movie not break privious eid release films record | बॉक्स ऑफिसवर नाही चालली सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ची जादू, पहिल्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

बॉक्स ऑफिसवर नाही चालली सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ची जादू, पहिल्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान(Salman Khan) चा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ईदच्या निमित्ताने सलमान 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट घेऊन आला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याची खूप चर्चा होती. हा चित्रपट पहिल्याच दिवशी चित्रपटगृहात रेकॉर्डब्रेक कामगिरी करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती. पण या चित्रपटाने पहिल्या दिवशी निर्मात्यांची निराशा केली आहे. 

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अनेक दिवसांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते.  'किसी का भाई किसी की जान' शुक्रवार, २१ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ईदला रिलीज झालेला 'किसी का भाई किसी की जान' पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेल अशी अपेक्षा होती. 

पहिल्या दिवशी सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट शाहरुख खानच्या ‘पठाण’सारखी चांगली कामगिरी करेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र तसं काहीही झालं नाही. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी भारतातून फक्त १५ कोटींची कमाई केली. सलमान खानच्या आधी रिलीज झालेल्या चित्रपटांच्या तुलनेतही ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची कमाई कमी आहे. तर आज ईदच्या दिवशी हा चित्रपट मला गल्ला जमवेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे.


सलमान खान प्रॉडक्शनच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाचं दिग्दर्शन फरहाद सामजीनं केलं आहे. सलमान खान,व्यंकटेश दग्गुबाती,पूजा हेगडे,जगपति बाबू,भूमिका चावला,विजेंदर सिंग,अभिमन्यु सिंग,राघव जुयाल,सिद्धार्थ निगम,जस्सी गिल,शहनाज गिल,पलक तिवारी आणि विनाली भटनागर अशी भलीमोठी स्टारकास्ट आहे. 

Web Title: kisi ka bhai kisi ki jaan box office salman khan movie not break privious eid release films record