सलमान खानचा 'किसी का भाई, किसी की जान' बॉक्स ऑफिसवर ठरला फेल, सोमवारी केली फक्त इतकीच कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 05:46 PM2023-05-02T17:46:38+5:302023-05-02T17:49:02+5:30

सोमवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारच निराशाजनक कामगिरी केली आहे.

kisi ka bhai kisi ki jaan box office collection day 11 salman khan shehnaaz gill pooja hegde film failed in monday test | सलमान खानचा 'किसी का भाई, किसी की जान' बॉक्स ऑफिसवर ठरला फेल, सोमवारी केली फक्त इतकीच कमाई

सलमान खानचा 'किसी का भाई, किसी की जान' बॉक्स ऑफिसवर ठरला फेल, सोमवारी केली फक्त इतकीच कमाई

googlenewsNext

बॉलिवूडचा दबंग सलमान खान ईदच्या मुहूर्तावर 'किसी का भाई, किसी की जान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला.  मात्र, यावेळी सलमान खानची जादू फिकी पडली. भाईजानच्या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली, पण दिवसेंदिवस चित्रपटाची कमाई घसरत गेली. चित्रपटाचे कलेक्शन जवळपास 50 कमी झाले आहे. मात्र, तरीही हा चित्रपट दुसऱ्या वीकेंडला कमाई करेल, अशी चाहत्यांना आशा होती, मात्र तसे होऊ शकले नाही. आता सोमवारीही 'किसी का भाई, किसी की जान' बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत अपयशी ठरला.

सलमान खानच्या स्टारडमनुसार, त्याचा चित्रपट चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. दुसऱ्या वीकेंडला भाईजानच्या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला खरा, पण सोमवारी पुन्हा एकदा 'किसी का भाई, किसी की जान'च्या कमाईत बॉक्स ऑफिसवर घसरण झाली.

अॅक्शन आणि रोमँटिक चित्रपटाने रविवारी एकूण 4.35 कोटींचा गल्ला जमवला, तर सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झाली आणि केवळ 2.48 कोटींचा बिझनेस करू शकला.

सलमान खानचा चित्रपट 'किसी का भाई, किसी की जान' हा तमिळ चित्रपट वीरमचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजित कुमार आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत होते. किसी की भाई, किसी की जानमध्ये तिने पहिल्यांदाच सलमान खानसोबत मुख्य भूमिका साकारली होती. या दोन स्टार्सशिवाय शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ आनंद तसेच साऊथ स्टार व्यंकटेश आणि जगपती बाबू हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.


 

Web Title: kisi ka bhai kisi ki jaan box office collection day 11 salman khan shehnaaz gill pooja hegde film failed in monday test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.