आमीर खानसोबत अशी झाली होती किरणची भेट, अर्ध्या तासाच्या फोन कॉलने बदललं आयुष्य...

By अमित इंगोले | Updated: November 7, 2020 10:20 IST2020-11-07T10:15:36+5:302020-11-07T10:20:11+5:30

किरणआधी आमीर खानचं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. त्यांचा घटस्फोट झाला आणि किरणच्या रूपाने त्याला पुन्हा प्रेम मिळालं. चला जाणून घेऊ किरण आणि आमीर खानची लव्हस्टोरी...

Kiran Rao birthday special personal life love story Aamir Khan | आमीर खानसोबत अशी झाली होती किरणची भेट, अर्ध्या तासाच्या फोन कॉलने बदललं आयुष्य...

आमीर खानसोबत अशी झाली होती किरणची भेट, अर्ध्या तासाच्या फोन कॉलने बदललं आयुष्य...

आमीर खानची पत्नी किरण राव आज(७ नोव्हेंबर)ला वाढदिवस साजरा करत आहे. किरण राव ही आमीर खानची दुसरी पत्नी. दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चाही बरीच झाली होती. लव्हस्टोरी इंटरेस्टींगही तेवढीच आहे. किरणआधी आमीर खानचं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. त्यांचा घटस्फोट झाला आणि किरणच्या रूपाने त्याला पुन्हा प्रेम मिळालं. चला जाणून घेऊ किरण आणि आमीर खानची लव्हस्टोरी...

कशी झाली दोघांची भेट?

एका मुलाखतीत आमीर खानने सांगितले होते की, मी जेव्हा 'लगान' सिनेमा करत होतो तेव्हा किरणसोबत भेट झाली होती. ती असिस्टंट डायरेक्टरपैकी एक होती. पण त्यावेळी आमच्यात काहीच नातं नव्हतं. आमची मैत्रीपण झाली नव्हती. ती यूनिटचा भाग होती. 

माझ्या घटस्फोटानंतर काही काळाने मी तिला पुन्हा भेटलो. ट्रॉमाच्या त्या फेजमध्ये तिचा फोन आला होता आणि मी तिच्यासोबत अर्धा तास बोललो. जेव्हा मी फोन ठेवला तेव्हा मी म्हणालो 'My God! जेव्हा मी तिच्यासोबत बोलतो तेव्हा मला फार आनंद होतो'. त्यानंतर आम्ही डेटींग सुरू केलं. लग्नाआधी आम्ही दीड वर्षे सोबत होतो.

दरम्यान २००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. प्रोफेशनल लाइफबाबत सांगायचं तर किरण सिने निर्माती, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्हसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. धोबी घाट या सिनेमाचं तिने दिग्दर्शनही केलं आहे. 
 

Web Title: Kiran Rao birthday special personal life love story Aamir Khan