फक्त 6 जणांना इंस्टाग्रामवर फॉलो करतो किंग खान, कोण आहेत हे खास लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 03:48 PM2023-10-04T15:48:06+5:302023-10-04T15:49:57+5:30

शाहरुख खान त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फक्त सहा जणांना फॉलो करतो.

King Khan follows only 6 people on Instagram, who are these special people | फक्त 6 जणांना इंस्टाग्रामवर फॉलो करतो किंग खान, कोण आहेत हे खास लोक

Shahrukh Khan

googlenewsNext

बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘जवान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘पठाण’नंतर हा त्याचा दुसरा असा चित्रपट आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे आणि अनेक विक्रम मोडले आहेत. त्याच्या फॅन फॉलोइंगमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  

शाहरुख खानचे त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 42.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इतक्या फॉलोअर्सपैकी शाहरुख खान त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फक्त सहा जणांना फॉलो करतो. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत ते 6 लोक, ज्यांना बॉलिवूडचा किंग खान फॉलो करतो.


गौरी खान

 शाहरुख खान हा पत्नी गौरी खानला इंस्टाग्रामवर फॉलो करतो. गौरीचे स्वतः इंस्टाग्रामवर 5.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. गौरी खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा फोटो पोस्ट करत असते.

सुहाना खान

लाडाची लेक सुहाना खानला शाहरुख इंस्टाग्रामवर फॉलो करतो.  सुहाना लवकरच दिग्दर्शिका झोया खानच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.  तिचे इंस्टाग्रामवर आधीपासूनच 4.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. शाहरुख खान आणि मुलगी सुहाना खानमध्ये खूप चांगले बाँडिंग आहे.

आर्यन खान

शाहरुख खान हा मुलगा आर्यन खानलाही इंस्टाग्रामवर फॉलो करतो. आर्यनचे इंस्टाग्रामवर 2.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. शाहरुख खानप्रमाणेच आर्यन खानलाही चित्रपट क्षेत्रातच रस आहे. चित्रपट क्षेत्रातील आवडीपोटीच आर्यनने कॅलिफोर्नियाच्या महाविद्यालयात फिल्म मेकिंगचा कोर्स पूर्ण केला. आर्यनला अभिनयाऐवजी दिग्दर्शनात रस आहे, असं शाहरूखनं अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

पूजा ददलानी

कुटुंबाव्यतिरिक्त शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानीलाही इंस्टाग्रामवर फॉलो करतो. पूजा ददलानी ही 2012 पासून शाहरुख खान याचे सर्व काम सांभाळत आहे. विशेष म्हणजे तिने यापूर्वी शाहरुखचे प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटही सांभाळले आहे. शाहरुख खान याच्यासोबतच नाही तर त्याच्या कुटुंबियांसोबतही पूजा ददलानी हिचे खूप चांगले संबंध आहेत.

आलिया छिब्बा

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आलिया छिब्बा कोण आहे, जिला शाहरुख खान इंस्टाग्रामवर फॉलो करतो. तर आलिया ही गौरी खानचा भाऊ विक्रांतची मुलगी आहे. नात्याने गौरी खान ही आलिया छिब्बाची आत्या आहे.  शिवाय, आलिया आणि सुहानामध्ये खास मैत्रीही आहे. तसेच फॅमिली फंक्शन्स आणि पार्ट्यांमध्ये ती सुहाना आणि आर्यन खानसोबत दिसते. आलिया तिच्या फॅशन सेन्स आणि आउटफिट्समुळे नेहमीच चर्चेत असते.

काजल आनंद

काजल आनंद ही शाहरुखची जवळची मैत्रीण आहे. पेशाने वकील असलेली काजल आनंद संजय दत्तच्या कायदेशीर टीमच्या सदस्यांमध्ये होती. काजल आनंद सेलिब्रिटींच्या केसेस हाताळते. ज्यामध्ये शाहरुख खानचीही अनेक प्रकरणे आहेत. अशा परिस्थितीत शाहरुख खान देखील इंस्टाग्रामवर काजल आनंदला फॉलो करतो.

Web Title: King Khan follows only 6 people on Instagram, who are these special people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.