​किंग खानने साजरा केला नव्या घरात बर्थडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 10:56 IST2016-11-02T10:56:55+5:302016-11-02T10:56:55+5:30

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज वाढदिवस. ५१ वर्षाच्या या सुपरस्टारची क्रेझ, लोकप्रियता, चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. दरवर्षी त्याच्या ‘मन्नत’ ...

King Khan celebrates birthday in new house! | ​किंग खानने साजरा केला नव्या घरात बर्थडे!

​किंग खानने साजरा केला नव्या घरात बर्थडे!

लीवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज वाढदिवस. ५१ वर्षाच्या या सुपरस्टारची क्रेझ, लोकप्रियता, चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. दरवर्षी त्याच्या ‘मन्नत’ बंगल्यावर साजरा होणारा त्याचा वाढदिवस यंदा मात्र नव्या घरी सेलिब्रेट करण्यात आला.

त्याने मुंबईपासून जवळ अलिबाग येथे नवे घर खरेदी केले आहे. पत्नी गौरीने सजवलेल्या या नव्या घरात किंग खानने त्याच्या जवळच्या मित्रांसोबत पार्टी केली. इंडस्ट्रीमधील निवडक लोकांनाचा या पार्टीचे आमंत्रण देण्यात आले होते.

सर्व प्रथम रणबीर कपूर आणि ‘एसआरके’चा बेस्ट फ्रेंड करण जोहर पार्टीला पोहचले. त्याबरोबरच फराह खान, अभिषेक बच्चन, मनिष मल्होत्रा यांनीदेखील बर्थडे बॅशला हजेरी लावली. तसेच शाहरुखचे इतर जवळचे मित्रदेखील यावेळी उपस्थित असल्याचे कळतेय.

शाहरुख पुढील महिन्यात गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिटर जिंदगी’मध्ये आलिया भटसोबत झळकणार आहे. त्याच्याबद्दल बोलताना आलिया म्हणते की, तुमच्यामध्ये जर शाहरुखसारखी प्रचंड ऊर्जा असेल तर वयाचा काहीच परिणाम होत नाही. कामाच्याप्रती त्याचे समर्पण आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची  सवय सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.

                                  SRK Birth Day

दिवाळीला प्रदर्शित झालेल्या करणच्या ‘ऐ दिल’मध्येसुद्धा शाहरुख पाहुण्या कलाकाऱ्याच्या भूमिकेत असून  ऐश्वर्या रायच्या पूर्व पती म्हणून तो दिसतो. तसेच पुढील वर्षी त्याचा बहुप्रतिक्षित ‘रईस’ प्रदर्शित होणार आहे.

अशा या ग्लोबल सुपरस्टार आणि रोमान्सच्या बादशाहला ‘सीएनएक्स मस्ती’कडून वाढदिवाच्या खूप खूप शुभेच्छा!

Web Title: King Khan celebrates birthday in new house!