किम शर्मा म्हणते, मी कुठल्याही आर्थिक संकटात नाहीय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 16:09 IST2017-04-11T10:39:20+5:302017-04-11T16:09:57+5:30

किम शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईत आहे. मुंबईत किम नव्या कामाच्या शोधात असून आर्थिक तंगीतून जात असल्याची चर्चा गेल्या ...

Kim Sharma says, I am not in any financial crisis! | किम शर्मा म्हणते, मी कुठल्याही आर्थिक संकटात नाहीय!

किम शर्मा म्हणते, मी कुठल्याही आर्थिक संकटात नाहीय!

म शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईत आहे. मुंबईत किम नव्या कामाच्या शोधात असून आर्थिक तंगीतून जात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून कानावर येत आहे. पण किमने या सगळ्या चर्चा धुडकावून लावल्या आहेत. twitterवर तिने या संणूर्ण चर्चांवर खुलासा दिला आहे.  थायलंडमध्ये कोल्ड प्ले म्युझिक कॉन्सर्ट अटेंड करत मस्तपैकी वीकेंड एन्जॉय केला आणि तिथून परतल्यावर मी कंगाल झाल्याच्या चर्चा मला ऐकायला मिळाल्या. पण अशा बकवास बातम्या छापण्याआधी माझ्या तोंडून ऐका की, असे काहीही नाहीय, असे tweet किमने केले आहे.
केन्या सोडून किम शर्मा मुंबईत परतलीय.

किम तिचा बिझनेसमॅन पती अली पुंजानीपासून वेगळी झाल्याची खबर आहे. विशेष म्हणते किमने नाही तर अलीने किमला सोडल्याची चर्चा सध्या रंगली आहे.अलीच्या आयुष्यात एक नवी मुलगी आली आहे. या नव्या मुलीसाठी अलीने किमला सोडल्याचे कळते. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून किम मुंबईत राहते आहे. अलीने किमसोबत लग्न करण्यासाठी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. म्हणजेच किमसोबतचे अलीचे हे दुसरे लग्न आहे. पण आता हे दुसरे लग्न मोडून अली तिसºया लग्नाच्या तयारीत आहे. किम अलीसोबत केन्यामध्ये राहायची. त्याच्याच कंपनीत सीईओ म्हणून ती कार्यरत होती. पण आता केन्यासोबतच हे सीईओपद  सोडून किम मुंबईत परतली आहे. अर्थात यावर किमने काहीही खुलासा केला नाही. ती केवळ आर्थिक तंगीबाबत बोलली. आता मुंबईत राहून किम चित्रपटांत परतणार का, हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.

Web Title: Kim Sharma says, I am not in any financial crisis!