सिद्धार्थचा 'योद्धा' त्याच्या बायकोला कसा वाटला? कियारा पोस्ट लिहून म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 11:50 IST2024-03-15T11:49:05+5:302024-03-15T11:50:46+5:30

'योद्धा' बघितल्यावर सिद्धार्थची पत्नी कियाराने तिचं मत सोशल मीडियावर शेअर केलंय.

kiara advani reaction after watch Siddharth malhotra yodha movie | सिद्धार्थचा 'योद्धा' त्याच्या बायकोला कसा वाटला? कियारा पोस्ट लिहून म्हणाली...

सिद्धार्थचा 'योद्धा' त्याच्या बायकोला कसा वाटला? कियारा पोस्ट लिहून म्हणाली...

सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' सिनेमा आज सगळीकडे रिलीज झाला. 'योद्धा' सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. अखेर 'योद्धा' आज रिलीज झालाय. सिद्धार्थचा 'योद्धा' पाहायला काल त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. सिद्धार्थचे आई - बाबा आणि त्याची पत्नी अन् सुप्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी सुद्धा उपस्थित होती. कियाराने 'योद्धा' पाहून तिची प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केली.

सिद्धार्थचा 'योद्धा' सिनेमातील एक फोटो पोस्ट करून कियारा लिहीते... "तु आम्हाला सर्वांना अभिमान वाटेल असं काम केलं आहेस. तू सर्वश्रेष्ठ आहेस. सागर-पुष्कर मला विश्वास होत नाहीय की हा तुमचा पहिला सिनेमा आहे." अशी पोस्ट लिहून कियाराने दिशा पटानी आणि राशी खन्ना या अभिनेत्रींचंही कौतुक केलंय. कियाराने सिद्धार्थचं तोंड भरून कौतुक केलं असून 'योद्धा' च्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

करण जोहर दिग्दर्शित 'योद्धा' सिनेमा आज १५ मार्चला रिलीज झालाय. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत असुन राशी खन्ना, दिशा पटानी या अभिनेत्रीही झळकल्या आहेत. सागर आंब्रे - पुष्कर झा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 'शेरशाह' नंतर सिद्धार्थ पुन्हा एकदा या सिनेमात इंडियन आर्मी ऑफीसरच्या भूमिकेत झळकला आहे.

 

Web Title: kiara advani reaction after watch Siddharth malhotra yodha movie