'तू तर मोठ्या बढाया मारतोस'; कियारा-सिद्धार्थमध्ये वादाची ठिणगी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 17:48 IST2022-08-12T17:47:55+5:302022-08-12T17:48:43+5:30
Kiara advani: अलिकडेच कियाराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने सिद्धार्थला टॅग केलं होतं.

'तू तर मोठ्या बढाया मारतोस'; कियारा-सिद्धार्थमध्ये वादाची ठिणगी?
बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार त्यांच्या लव्हलाइफमुळे चर्चेत येत आहेत. त्यातलीच एक जोडी म्हणजे कियारा आडवाणी (kiara advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra). 'शेरशाह' (shershaah) या चित्रपटात एकत्र झळकल्यापासून या जोडीची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. मात्र, हे दोघंही या नात्यावर भाष्य करणं टाळतात. सध्या सोशल मीडियावर कियाराची एक पोस्ट चर्चेत येत आहे. या पोस्टमध्ये तिने सिद्धार्थला जाहीरपणे टोला लगावला आहे.
अलिकडेच कियाराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने सिद्धार्थला टॅग केलं होतं. इतकंच नाही तर तू फार मोठ्या बढाया मारतोस असंही तिने म्हटलं होतं. त्यामुळे तिची ही पोस्ट सध्या चर्चेत येत आहे.
"सिद्धार्थ मल्होत्रा तू तर मोठमोठ्या बढाया मारतोस, पण, तू सुद्धा 'आऊट ऑफ साइट, आऊट ऑफ माइंड' प्रकारातसा निघालास", असं म्हणत कियाराने ही पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, कियाराची ही पोस्ट पाहिल्यानंतर या दोघांमध्ये काही तरी बिनसलंय असं प्रथम दिसून येतं. मात्र, प्रत्यक्षात तसं अजिबात नाही. कियाराच्या या पोस्टमागे एक वेगळीच कथा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी कियारा-सिद्धार्थचा शेरशाह हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. त्यामुळे कियाराने या चित्रपटातील हा एक डायलॉग शेअर करत सिद्धार्थला टॅग केलं आहे.