सोनम कपूरच्या बर्थडे पार्टीत खूशी कपूरचं बॉयफ्रेंड वेदांग रैनासोबत झालं भांडण?, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:20 IST2025-06-09T18:19:58+5:302025-06-09T18:20:30+5:30

आर्चीज, लव्हयापा आणि नादानियां या चित्रपटांमध्ये झळकलेली खुशी कपूर (Khushi Kapoor) तिच्या प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते.

Khushi Kapoor had a fight with boyfriend Vedang Raina at Sonam Kapoor's birthday party?, video goes viral | सोनम कपूरच्या बर्थडे पार्टीत खूशी कपूरचं बॉयफ्रेंड वेदांग रैनासोबत झालं भांडण?, व्हिडीओ व्हायरल

सोनम कपूरच्या बर्थडे पार्टीत खूशी कपूरचं बॉयफ्रेंड वेदांग रैनासोबत झालं भांडण?, व्हिडीओ व्हायरल

आर्चीज, लव्हयापा आणि नादानियां या चित्रपटांमध्ये झळकलेली खुशी कपूर (Khushi Kapoor) तिच्या प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. गेल्या काही काळापासून तिचे नाव अभिनेता वेदांग रैना(Vedang Raina)सोबत जोडले जात आहे. आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्यात ती वेदांगसोबत भांडत असल्याचं बोललं जातंय.

खरेतर, काल रात्री सोनम कपूरच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त अनिल कपूरच्या बंगल्यावर एक भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती, जिथे करीना कपूर खान, भूमी पेडणेकर, करण जोहर आणि मसाबा गुप्ता यांच्यासह अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. सोनमची चुलत बहीण आणि जान्हवी कपूरची सख्खी बहीण खूशी कपूर देखील पार्टीला उपस्थित होती.


या पार्टीत खुशीसोबत वेदांग रैनाही उपस्थित होता. सोनमच्या वाढदिवसाच्या पार्टीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये खुशी आणि वेदांग एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दोघेही काहीतरी गंभीर विषयावर बोलत असल्याचे दिसून येते. यादरम्यान वेदांग खुशीला त्याचा फोनही दाखवत आहे. इतकेच नाही तर खुशी कपूर तिथून निघून जात असताना वेदांग तिचा हात धरतो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. आता या व्हिडीओनंतर लोक असा अंदाज लावत आहेत की कदाचित दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद झाला असेल.

वेदांग आणि खुशीने या सिनेमात केलंय एकत्र काम
वेदांग आणि खुशी यांनी द आर्चीजमध्ये एकत्र काम केले आहे. झोया अख्तरने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातून दोघांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शूटिंग दरम्यान ते चांगले मित्र बनले आणि तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. वेदांगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आलिया भटच्या जिगरा चित्रपटातही काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
 

Web Title: Khushi Kapoor had a fight with boyfriend Vedang Raina at Sonam Kapoor's birthday party?, video goes viral