असा आहे ‘गेमप्लान’; आर्यन खानसोबत होणार खुशी कपूरचा डेब्यू??

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 12:26 IST2018-08-27T12:24:53+5:302018-08-27T12:26:00+5:30

बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिने बॉलिवूडमध्ये यशस्वी डेब्यू केला. आता वेळ आलीयं ती, बोनी व श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर हिच्या डेब्यूची.

Khushi Kapoor to be launched opposite Aryan? | असा आहे ‘गेमप्लान’; आर्यन खानसोबत होणार खुशी कपूरचा डेब्यू??

असा आहे ‘गेमप्लान’; आर्यन खानसोबत होणार खुशी कपूरचा डेब्यू??

बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिने बॉलिवूडमध्ये यशस्वी डेब्यू केला. आता वेळ आलीयं ती, बोनी व श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर हिच्या डेब्यूची. होय, मोठ्या बहिणीप्रमाणेचं खुशीनेही अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतलाय. कपूर फॅमिलीच्या निकटस्थ सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर, करण जोहर हाच खुशीला लॉन्च करणार आहे. तूर्तास तरी खुशीचा डेब्यू सीक्रेट ठेवण्यात आला आहे. पण याबद्दलची एक चर्चा मात्र जोरात आहे. होय, किंगखान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अपोझिट खुशीला लॉन्च केले जाऊ शकते. हाच करणचा ‘गेम प्लान’ आहे. आता यात करण किती यशस्वी ठरतो आणि या ‘गेम प्लान’नंतर खुशीचे करिअर कुठल्या वळणाला जाते, ते लवकरचं कळेल.

अलीकडे एका ताज्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी खुशीच्या निर्णयाबद्दल सांगितले होते.  ‘चित्रपटात येण्यासाठी मी जान्हवीला प्रोत्साहित केले, असे मी म्हणणार नाही. पण हो, मी तिला स्वातंत्र्य जरूर दिले. तुला जे करायचे ते कर, हेच मी तिला सांगितले. शेवटी तिच्या इच्छेचा बळी घेणारा मी कोण? अर्जुनमध्ये अ‍ॅक्टिंगचे गुण आहेत, हे सलमानने सांगेपर्यंत मलाही ठाऊक नव्हते. पण त्याचे हे गुण समोर आल्यानंतर त्यालाही मी तेवढीच मोकळीक दिली. अंशुलाचे म्हणाल तर तिला शिक्षणात अधिक रस आहे. खुशी आधी मॉडेल बनू इच्छित होती. पण आता तिचा कल अभिनयाकडे दिसतोय. आता तिलाही अभिनय क्षेत्रात यायचे आहे’, असे बोनी कपूर म्हणाले होते. 
मृत्यूपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत श्रीदेवी यांनीही खुशीला मॉडेलिंगमध्ये रस असल्याचे सांगितले होते. खरे तर जान्हवीने डॉक्टर बनावे आणि खुशीने अभिनेत्री, अशी श्रीदेवींची इच्छा होती. पण जान्हवीने अभिनेत्री व्हायचे ठरवले, तेव्हा त्या तिच्यामागे खंबीरपणे उभ्या राहिल्या.  

 

Web Title: Khushi Kapoor to be launched opposite Aryan?