खुल्लम खुल्ला प्यार करेंगे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 18:23 IST2016-11-29T18:23:23+5:302016-11-29T18:23:23+5:30

   priyanka londhe             जान्हवी कपूर : श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी सध्या करण जोहरच्या सैराट ...

Khullam Khulla will love ... | खुल्लम खुल्ला प्यार करेंगे...

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे...

  
 priyanka londhe
           
जान्हवी कपूर : श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी सध्या करण जोहरच्या सैराट चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. परंतू याआधी देखील जान्हवीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आठवतेय का तुम्हाला, काही दिवसांपुर्वी जान्हवी एका मुलाल किस करतानाचा फोटो सोशल साईट्सवर व्हायरल झाला होता. हा मुलगा दुसरा कोणी नसून तो माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया हा आहे. अनेक दिवसांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जातेय. नुकतेच जान्हवी आणि शिखर डिअर जिंदगी या चित्रपटाच्या प्रिमीअर शोला श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या सोबत दिसले होते. 



सारा खान : सैफ अली खानची मोठी मुलगी सारा खान आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी या दोघींमध्ये एक नवे नाते लवकरच निर्माण होऊ शकते. कारण सारा सुशील कुमार शिंदे यांच्या दुसºया नातवा सोबत म्हणजेच वीर पहाडिया सोबत रिलेशनमध्ये असल्याचे समोर आले आहे. सारा आणि वीरचे काही फोटो सोशल साईट्सवर व्हायरल झाले आहेत. सारा या फोटोमध्ये वीर सोबत एकदमच हॅपी मुडमध्ये पहायला मिळतेय. तर या दोघांच्या रिलेशनला नवाब सैफने ग्रीन सिग्नल दिल्याचे कळतेय. एवढेच नाही तर या दोघांचा साखरपुडा देखील झाला असल्याचे बोलले जात आहे. आता हे कितपत खरे आहे ते लवकरच समजेल.



जुनैद खान : आमीर खानच्या चिमुकल्याला आपण सर्वांनीच अकेले हम अकेले तुम या चित्रपटात पाहिले होते. जुनैद त्यानंतर बॉलिवूडमध्ये कुठे दिसलाच नाही. तो चित्रपटांमध्ये येणार असल्याच्ये मध्यंतरी बोलले जात होते. परंतू सध्या तो एका वेगळ््या विषयामुळेच लक्ष वेधून घेत आहे. जुनैद त्याच्या कॉलेज मधील सोनम वर्मा या मुलीसोबत रिलेशनशिप असल्याचे समजत आहे. बातम्यांनुसार, जुनैदने सोनमची भेट आमिरसोबत घालून दिली आहे. आता मिस्टर परफेक्शनीस्टने होकार दिला तर लवकरच आमीर सरुरजी होणार यात काही शंका नाही.



कृष्णा श्रॉफ : जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा नेहमीच तिच्या सोशल साईट्सवरील फोटोंमुळे चर्चेत राहीली आहे. कृष्णाचे काही बोल्ड फोटोज काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. परंतू आता तिचे एका फिरंगी मुला सोबतचे फोटो समोर आले आहेत. कृष्णाचे अफेअर कुणापासूनही लपून राहिलेले नाही. २१ वर्षीय कृष्णाने तिचा ब्राझिलियन बॉयफ्रेंड स्पेंसर जॉनसनसोबतचे अनेक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ब्राझीलच्या एका स्पोर्ट्स कंपनीत फुटबॉल ट्रेनर असलेल्या स्पेंसरला कृष्णाचे संपूर्ण कुटुंब ओळखतं. 


नव्या नवेली नंदा : अमिताभ बच्चन यांची नात सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहीली आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या माहिती नुसार 
 नव्या नवेली नंदा शाहरुख खानचा मुलगा आर्यनला नव्हे तर लंडन बेस्ट हॅरी गिलिसला डेट करत आहे. हे दोघेही लंडनच्या सेवन आॅक्स स्कूलमध्ये एकत्र शिकत होते. शाहरुखचा मुलगा आर्यन देखील नव्याचा चांगला मित्र असल्याचे बोलले जात आहे. परंतू आता ती हॅरी सोबत रिलेशनमध्ये असल्याचे समजत आहे. 

Web Title: Khullam Khulla will love ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.