KHULLAM KHULLA: जेव्हा संजय दत्त निघाला होता रणबीर कपूरच्या वडिलांना मारायला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 13:05 IST2017-02-04T07:35:01+5:302017-02-04T13:05:01+5:30

शीर्षक वाचून दचकलात ना? अहो, बातमीच तशी आहे. बॉलीवूूडचा ‘खलनायक’ संजय दत्त चक्क ऋषी कपूर यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी ...

KHULLAM KHULLA: When Sanjay Dutt was leaving Ranbir Kapoor's father killed ... | KHULLAM KHULLA: जेव्हा संजय दत्त निघाला होता रणबीर कपूरच्या वडिलांना मारायला...

KHULLAM KHULLA: जेव्हा संजय दत्त निघाला होता रणबीर कपूरच्या वडिलांना मारायला...

र्षक वाचून दचकलात ना? अहो, बातमीच तशी आहे. बॉलीवूूडचा ‘खलनायक’ संजय दत्त चक्क ऋषी कपूर यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. घरात घुसून मारण्यापर्यंत दोघांचे संबंध एवढे कसे बिघडले? नेमके झाले काय होते? असे सगळे प्रश्न पडणे स्वभाविक आहेत.

नुकतेच प्रकाशित झालेल्या 'खुल्लम खुल्ला' या आत्मचरित्रात ऋषी कपूर यांनी या घटनेचा उल्लेख केला आहे. बॉलीवूडचा ‘बॅडमॅन’ गुलशन ग्रोव्हरनेदेखील याला दुजोरा देताना सांगितले की, ' संजूचे तेव्हा टीना मुनिमसोबत प्रेमसंबंध होते. पण चिंटूशीही ( ऋषी कपूर यांचे टोपणनाव) तिचे प्रेमप्रकरण आहे, असा संशय संजूला होता. मी आणि संजू दोघेही भावाप्रमाणे होतो. त्यामुळे त्याने मला एक दिवस सांगितलं की, आपल्याला ऋषी कपूरच्या घरी जाऊन त्याला बदडायचं आहे.’

ALSO READ: ऋषी कपूरला का वाटते अमिताभ बच्चन करतात श्रेय देण्यात कंजूषी?

त्याप्रमाणे ते दोघे तेथे गेलेदेखील; पण तेवढ्यात नीतू सिंगने (ऋषी कपूरची पत्नी व त्याकाळची गर्लफ्रेंड) त्यांना थांबवले आणि टीना-ऋषीमध्ये असे काहीही नसल्याची ग्वाही दिली. ‘त्यामुळे संजू शांत झाला आणि आम्ही तेथून निघालो', अशी माहिती गुलशन ग्रोव्हर यांनी दिली. त्यानंतर काही काळाने ऋषी कपूर आणि नीतू सिंग विवाहबद्ध झाले.

कालांतराने संजय दत्त आणि ऋषी कपूर यांचे संबंध सुधारले. दोघांनी ‘अग्निपथ’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. विशेष म्हणजे संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटात ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर संजूची भूमिका करीत आहे. राजू हिराणी दिग्दर्शित या चित्रपटाची गेल्या महिन्यात शूटींगसुद्धा सुरू झाली. आता सिनेमात ऋषी कपूर यांना मारण्याचा प्रसंग असेल का? आणि असेल तर रणबीर कपूर तो कसा करेल अशी रंजक शक्यता निर्माण झाली आहे.

ALSO READ: ​ऋषी कपूरचे दाऊदसोबत चहापान!

Web Title: KHULLAM KHULLA: When Sanjay Dutt was leaving Ranbir Kapoor's father killed ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.