‘केजीएफ 2’च्या टीजरने 24 तासांत रचला इतिहास, सोशल मीडियावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 14:45 IST2021-01-10T14:43:59+5:302021-01-10T14:45:30+5:30

पहिल्या दोनच तासांत 15 लाख लोकांनी पाहिला टीजर...

kgf 2 teaser crosses 78 million views in just 24 hours in release yash thanks fans | ‘केजीएफ 2’च्या टीजरने 24 तासांत रचला इतिहास, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘केजीएफ 2’च्या टीजरने 24 तासांत रचला इतिहास, सोशल मीडियावर धुमाकूळ

ठळक मुद्दे‘केजीएफ- चॅप्टर 1’ या सिनेमाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा तुफान गाजला होता. ‘केजीएफ 2’ याचाच सीक्वल आहे. ‘

कन्नड सुपरस्टार यशच्याकेजीएफ 2’ या आगामी सिनेमाचा जबरदस्त टीजर तुम्ही पाहिला असेलच. तूर्तास सोशल मीडियावर या टीजरने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. इतका की, रिलीजनंतरच्या अवघ्या 24 तासांत या टीजरला युट्यूबवर 7 कोटींवर व्ह्युज मिळालेत. पहिल्या दोनच तासांत 15 लाख लोकांनी टीजर पाहिला.प्रेक्षकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने कोणाला आनंद होणार नाही. अभिनेता यश तर आनंदाने अगदी गदगद झाला. चाहत्यांचे त्याने मनापासून आभार मानलेत.
केजीएफ 2’चा टीजर यशच्या वाढदिवशी म्हणज 8 जानेवारीला रिलीज होणार होता. पण त्याआधी एकदिवस म्हणजे 7 जानेवारीलाच तो लीक झाला आणि यामुळे घाईघाईत एकदिवस आधीच अधिकृतरित्या टीजर रिलीज करण्यात आला. पण याऊपरही टीजरला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 

या टीजरची सुरुवात होते यश अर्थात रॉकीच्या बालपणाने. रॉकीची आई आणि त्याच्या बालपणीची झलक सुरुवातीला दिसते. रॉकीच्या आईने त्याला लहानाचे मोठे केले आणि कोणत्या परिस्थितीत तो मोठा झाला, हे सुरुवातीला दिसते. या टीझरमध्ये अभिनेत्री रविना टंडनचीही झलक पाहायला मिळते. ती एका राजकीय व्यक्तीच्या भूमिकेत दिसते.  संजय दत्तचा जबरदस्त अवतार टीजरमध्ये दिसतो. सुपरस्टार यशही दमदार स्टाईलमध्ये दिसतो. 

‘केजीएफ- चॅप्टर 1’ या सिनेमाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा तुफान गाजला होता. ‘केजीएफ 2’ याचाच सीक्वल आहे. ‘केजीएफ -1’  ज्या ठिकाणी संपला, तेथूनच पुढे ‘केजीएफ 2’ची कथा सुरु होत आहे. या सिक्वलमध्ये यशशिवाय संजय दत्त आणि रवीना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

Web Title: kgf 2 teaser crosses 78 million views in just 24 hours in release yash thanks fans