KBC च्या स्पर्धकाने ऐश्वर्या रायचे कौतुक करताच अमिताभ यांना वाटले वाईट, हे आहे त्यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 12:31 IST2019-10-26T12:27:34+5:302019-10-26T12:31:02+5:30

पूजाने ऐश्वर्याची प्रशंसा केल्यानंतर अमिताभ यांना वाईट वाटले.

KBC 11: Amitabh Bachchan was disappointed when a contestant praised Aishwarya Rai Bachchan’s eyes, here’s why | KBC च्या स्पर्धकाने ऐश्वर्या रायचे कौतुक करताच अमिताभ यांना वाटले वाईट, हे आहे त्यामागचे कारण

KBC च्या स्पर्धकाने ऐश्वर्या रायचे कौतुक करताच अमिताभ यांना वाटले वाईट, हे आहे त्यामागचे कारण

ठळक मुद्देपूजाने ऐश्वर्याची प्रशंसा केल्यानंतर अमिताभ यांनी पूजाला सांगितले की, तुम्ही माझ्या डोळ्यांचे कौतुक केले नाही. त्यामुळे मला प्रचंड वाईट वाटले. पण तुम्ही माझ्या सुनेच्या केलेल्या या प्रशंसेविषयी मी नक्कीच तिला सांगेन. 

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सगळेच सिझन चांगलेच गाजले आहेत. या कार्यक्रमाचा अकरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या सिझनला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील तसेच भारतातील विविध भागात राहाणारे लोक हजेरी लावत असतात. 

या कार्यक्रमातील स्पर्धक सात करोड रुपये जिंकण्याच्या आशेने या कार्यक्रमात हजेरी लावतात. त्यामुळे या कार्यक्रमात येणाऱ्या सगळ्या स्पर्धकांसाठी हा खेळ खूपच महत्त्वाचा असतो. पण हा खेळ सोडून अनेकवेळा स्पर्धक आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी कार्यक्रमात गप्पा मारताना देखील दिसतात.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातील अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना चांगलेच भावते. या कार्यक्रमात अमिताभ उपस्थित स्पर्धकांसोबत दिलखुलास गप्पा मारतात. या कार्यक्रमात पूजा झा नावाची स्पर्धक नुकतीच आली होती. 

अमिताभ यांनी पूजाला जोश या चित्रपटाविषयी एक प्रश्न विचारला होता. या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि शाहरुख खान भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसले होते. पूजाला याच विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. पूजाने काहीच क्षणात या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले. या प्रश्नानंतर पूजाने सांगितले की, ती ऐश्वर्या रायची खूप मोठी फॅन आहे आणि तिला ऐश्वर्याचे डोळे खूपच आवडतात. पण पूजाने ऐश्वर्याची प्रशंसा केल्यानंतर अमिताभ यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकताच उपस्थितांना आपले हसू आवरले नाही.

पूजाने ऐश्वर्याची प्रशंसा केल्यानंतर अमिताभ यांनी पूजाला सांगितले की, तुम्ही माझ्या डोळ्यांचे कौतुक केले नाही. त्यामुळे मला प्रचंड वाईट वाटले. पण तुम्ही माझ्या सुनेच्या केलेल्या या प्रशंसेविषयी मी नक्कीच तिला सांगेन. 

Web Title: KBC 11: Amitabh Bachchan was disappointed when a contestant praised Aishwarya Rai Bachchan’s eyes, here’s why