शिल्पानेच माझा संसार उध्वस्त केला, राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीने लावला आरोप, २ महिन्यांची मुलगी असतानाच झाला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 14:23 IST2021-05-03T14:19:41+5:302021-05-03T14:23:54+5:30

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा ही जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दोघं नवरा-बायको आपल्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात.

Kavita Kundra says Shilpa Shetty Responbile for Marriage Split | शिल्पानेच माझा संसार उध्वस्त केला, राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीने लावला आरोप, २ महिन्यांची मुलगी असतानाच झाला घटस्फोट

शिल्पानेच माझा संसार उध्वस्त केला, राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीने लावला आरोप, २ महिन्यांची मुलगी असतानाच झाला घटस्फोट

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या केमिस्ट्रीप्रमाणे त्याची लव्हस्टोरी देखील खास आहे. प्रत्येकाला यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेत. राज कुंद्राच्या पहिल्या लग्नाविषयी मीडियावमध्ये उलटसुटल चर्चा रंगत असतात. राज कुंद्राचे पहिले लग्न कविता कुंद्राबरोबर झाले होते.कविताने नेहमीच शिल्पा शेट्टीमुळे तिचा संसार उध्वस्त झाल्याचा आरोप लावला. या आरोपांमुळे खुद्द राज कुंद्राला शिल्पा आणि त्यांच्या कुटुंबाची माफी मागावी लागली होती.

कविता आणि राज कुंद्राचेही लव्हमॅरेज होते.लंडनमधल्या  व्यावसायिकाची कविता मुलगी आहे. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २००३ मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. २००६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेत वेगळे झाले. यानंतर २००९ मध्ये राज कुंद्राचे शिल्पासह दुसरे लग्न झाले.

शिल्पाच्या एस २ परफ्युम लॉन्चच्या वेळी पहिल्यांदा दोघांची ओळख झाली होती. त्यावेळी शिल्पाला राज कुंद्राने बरीच मदतही केली होती. तर दुसरीकडे कवितालाही शिल्पामुळे दोघांचे नाते तुटल्याचे वाटु लागले होते. कवितासह लग्नबंधनात असनाताच राजची शिल्पासह ओळख झाली होती. पहिल्या भेटीनंतर कविताजवळ राज नेहमीच शिल्पाचे कौतुक करत असल्याचे तिने सांगितले होते. शिल्पासह लग्न करण्यासाठी राज कविताला घटस्फोट देण्यासाठी फोर्स करायचा. जेव्हा राजने कवितासा घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. तेव्हा त्यांची मुलगी फक्त २ महिन्यांची होती.

यावर खुद्द राजने स्पष्टीकरण देताना सांगितले की, ज्यावेळी कवितासह घटस्फोट होणार होता. तेव्हा शिल्पाचा काही एक संबंध नव्हता. आम्ही केवळ एकमेकांना ओळखत होतो.चांगले मित्र होतो. कविताला घटस्फोट दिल्यानंतर ९ महिन्यांनी शिल्पासह राज कुंद्राचे अफेअर सुरु झाले. यानंतर कविता खूप दुखावली गेली होती. तिच्या सततच्या आरोपांमुळे राज कुंद्राने शिल्पा आणि कुटुंबियांना सगळ्या गोष्टी सांगत माफी मागितल्याचे सांगितले होते.

दरम्यान राज कुंद्राने शिल्पाला प्रपोज करण्यासाठी खास सरप्राईज प्लॅन केले होते. त्यावेळी शोच्या शूटिंगसाठी शिल्पा पॅरिसमध्ये होती. शिल्पाला फिल्मी स्टाइलने प्रपोज करण्यासाठी त्याने पॅरिस गाठले आणि तिथेच तिला हातात अंगठी घालत लग्नासाठी मागणी घातली होती. आज या कपलला दोन मुलं आहेत. विआन आणि मुलगी शमिषा असे त्यांची नावं आहेत.

Web Title: Kavita Kundra says Shilpa Shetty Responbile for Marriage Split