​‘टायगर जिंदा है’च्या सेटवर कॅटरिना कैफ कुणाच्या आठवणीने होतेयं व्याकूळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 10:22 IST2017-07-26T04:52:19+5:302017-07-26T10:22:19+5:30

कॅटरिना कैफ सध्या सलमान खानसोबत ‘टायगर जिंदा है’चे शूटींग करतेय. म्हणजेच कॅटरिनासोबत सलमान आहे. पण सलमानसोबत असूनही कॅटरिना एका ...

Katrina Kaif, who is remembered by the memories of 'Tiger is alive'? | ​‘टायगर जिंदा है’च्या सेटवर कॅटरिना कैफ कुणाच्या आठवणीने होतेयं व्याकूळ?

​‘टायगर जिंदा है’च्या सेटवर कॅटरिना कैफ कुणाच्या आठवणीने होतेयं व्याकूळ?

टरिना कैफ सध्या सलमान खानसोबत ‘टायगर जिंदा है’चे शूटींग करतेय. म्हणजेच कॅटरिनासोबत सलमान आहे. पण सलमानसोबत असूनही कॅटरिना एका व्यक्तिच्या आठवणीने व्याकूळ झाली आहे. ‘टायगर जिंदा है’च्या सेटवर राहून राहून कॅटला या व्यक्तिच्या आठवणी छळायला लागतात. ही व्यक्ती कोण? काही अंदाज बांधू शकता. काय? रणबीर कपूर. नाही... नाही... कॅट तिचा एक्स बॉयफ्रेन्ड रणबीरच्या आठवणीने व्याकूळ झाली आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. ‘टायगर जिंदा है’ सेटवर कॅटरिना ज्या व्यक्तीला मिस करतेय, ती व्यक्ती आहे, कबीर खान. होय, दिग्दर्शक कबीर खान. 



सलमान व कॅटरिना ‘एक था टायगर’ हा चित्रपट कबीर खाननेच दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट तुफान गाजला होता. ‘टायगर जिंदा है’ हा ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. पण हा चित्रपट कबीरऐवजी अली अब्बास जफर दिग्दर्शित करतो आहे. अलीसोबत काम करून कॅटरिना खूश नाही, असे नाही. अली माझा खूप चांगला मित्र आहे. तो एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे, असे कॅट म्हणते. आता असे असताना कॅटला कबीर खानची आठवण का यावी? तर ‘टायगर जिंदा है’शी ‘एक था टायगर’च्या अनेक आठवणी जुळल्या आहेत म्हणून. त्यामुळेच कॅटला कबीरची आठवण येतेय. एका मुलाखतीत ती यावर बोलली. आम्ही सगळे ‘टायगर जिंदा है’च्या सेटवर कबीरला मिस करतोय. मी तर अधिकच. पण बॉलिवूड असेच काम करते. एकत्र काम करताना इथे अनेक लोक जवळ येतात आणि पुन्हा आपआपल्या वाटेने चालायला लागतात. कदाचित हाच इथला नियम आहे, असे कॅट म्हणाली.

Web Title: Katrina Kaif, who is remembered by the memories of 'Tiger is alive'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.