'मेरी ख्रिसमस'च्या सेटवर कतरिना विजयला 'या' नावाने मारायची हाक, अभिनेत्याचं वयही केलं सर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 04:07 PM2023-12-29T16:07:32+5:302023-12-29T16:09:39+5:30

कतरिना विजयला कोणत्या नावाने हाक मारते याचा खुलासा नुकताच तिने केला आहे. 

Katrina Kaif was confused over what should she call vijay setupati sir or only vijay on the sets of merry christmas | 'मेरी ख्रिसमस'च्या सेटवर कतरिना विजयला 'या' नावाने मारायची हाक, अभिनेत्याचं वयही केलं सर्च

'मेरी ख्रिसमस'च्या सेटवर कतरिना विजयला 'या' नावाने मारायची हाक, अभिनेत्याचं वयही केलं सर्च

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आगामी 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) सिनेमात दिसणार आहे. यामध्ये साऊथ सुपरस्टार विजय सेतुपति (Vijay Setupati) मुख्य भूमिकेत आहे. श्रीराम राघवन यांच्या या सिनेमात दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा रंगली आहे. कतरिना विजयला कोणत्या नावाने हाक मारते याचा खुलासा नुकताच तिने केला आहे. 

'मेरी ख्रिसमस'च्या शूटिंगवेळी कतरिना कैफला कळत नव्हतं की विजय सेतुपतिला विजय सर म्हणायचं की फक्त विजय. ती म्हणाली,'मी आणि विकीने गुगलवरुन विजय सेतुपति यांचं वय शोधण्याचा प्रयत्न केला होता. मी विकीशी बोलत होते आणि म्हणाले विजय सर. तर तो म्हणाला तू विजय सर म्हणते.मी म्हणाले कधी कधी हो कधी कधी नाही. मग मात्र मी थेट विजय सेतुपतिलाच विचारलं की मी तुम्हाला काय बोलावू विजय सर की विजय.'

ती पुढे म्हणाली,'मी असं विचारताच आजूबाजूचे लोकही हसायला लागले. तेव्हाच मी आणि विकीने गुगलवर शोधलं. तर त्यांचं वय 44 असं दाखवलं. आम्हाला वाटलं वयावरुन आम्ही ठरवू काय हाक मारायची. पण मी नंतर अजूनच गोंधळात पडले.'

12 जानेवारी 2024 रोजी 'मेरी ख्रिसमस' रिलीज होत आहे. सिनेमाचं ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. श्रीराम राघवन यांचा 'अंदाधून' सिनेमा चांगलाच हिट झाला होता. आता 'मेरी ख्रिसमस' मधूनही ते हटके कहाणी घेऊन आले आहेत.

Web Title: Katrina Kaif was confused over what should she call vijay setupati sir or only vijay on the sets of merry christmas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.