कामावर परतल्याचा कतरिना कैफला झाला आनंद आहे, फोटो शेअर करत लिहिली ही खास गोष्ट

By गीतांजली | Updated: November 6, 2020 06:00 IST2020-11-06T06:00:00+5:302020-11-06T06:00:02+5:30

कतरिना रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमार सोबत दिसणार आहे.

katrina kaif shares pic in yellow dress happy to be in action | कामावर परतल्याचा कतरिना कैफला झाला आनंद आहे, फोटो शेअर करत लिहिली ही खास गोष्ट

कामावर परतल्याचा कतरिना कैफला झाला आनंद आहे, फोटो शेअर करत लिहिली ही खास गोष्ट

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ कामावर परतली आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने आनंद व्यक्त केला. कतरिनाने इन्स्टाग्रामवर एक पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधला फोटो शेअर केला आहे. या फोटोत कतरिना हसताना दिसतेय. मूड.. आपल्या टीमसोबत कामावर पतरल्याने आनंद मिळतो. अलीकडेच कतरिना एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, कतरिना रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. . 'फोन भूत'मध्ये इशान खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदीसोबत ती मुख्य भूमिकेत असणार आहे. कतरिना आणि इशाना नोव्हेंबरमध्ये गोव्यासाठी रवाना होणार आहेत. . गोव्यानंतर शूटिंग मुंबईत होणार आहे.

अली अब्बास जफरच्या सुपरहीरो सीरिजमध्ये देखील ती झळकणार आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे जो नेटफ्लिक्ससाठी तयार करण्यात येतो आहे. यात कतरिना सुपरहिरोची भूमिका साकारणार आहे. 1987 मध्ये आलेला अनिल कपूर आणि श्रीदेवीचा सुपरहिट फिल्म 'मिस्टर इंडिया' वर आधारित असेल.

सिनेमाचे बजेट खूप जास्त आहे आणि शूटिंग चार देशांमध्ये होणार आहे.जागरणच्या रिपोर्टनुसार अली अब्बास अलीकडेच म्हणाला की, सुपरहिरो सिनेमामधील काही सीन्ससाठी त्याने दुबई लॉकशन लॉक केले आहे. अलीने अबु धाबी आणि दुबईमधले काही लोकेशन्स बुक केले आहेत, जिथे सिनेमाची शूटिंग होणार आहे.
 

Web Title: katrina kaif shares pic in yellow dress happy to be in action