Tiger 3 च्या निराशाजनक कमाईनंतर कॅतरिना कैफ फ्रँचायझी सोडणार? सलमान खानला झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 11:18 AM2023-12-20T11:18:43+5:302023-12-20T11:19:42+5:30

टायगर आणि झोया ही चाहत्यांची अतिशय लाडकी जोडी आहे.

Katrina Kaif leaving tiger franchise she want zoya s character to have separate franchise told to salman khan and YRF | Tiger 3 च्या निराशाजनक कमाईनंतर कॅतरिना कैफ फ्रँचायझी सोडणार? सलमान खानला झटका

Tiger 3 च्या निराशाजनक कमाईनंतर कॅतरिना कैफ फ्रँचायझी सोडणार? सलमान खानला झटका

यशराज फिल्म्सचा 'टायगर 3' (Tiger 3) सिनेमा मागच्या महिन्यात रिलीज झाला. 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' च्या अद्भूत यशानंतर 'टायगर 3' कडूनही अपेक्षा होती. मात्र या तिसऱ्या भागात सलमान खान-कतरिना कैफची जादू फारशी चालली नाही. 'टायगर 3'ने बॉक्सऑफिसवर म्हणावी तशी कमाई केली नाही. आता लेटेस्ट रिपोर्टनुसार, कतरिना कैफने टायगर फ्रँचायझी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

टायगर आणि झोया ही चाहत्यांची अतिशय लाडकी जोडी आहे. मात्र आता कतरिना कैफच्या टायगर फ्रँचायझी सोडण्याच्या निर्णयाने चाहते निराश झालेत. कतरिनाला झोयाच्या भूमिकेत प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. तिचा चांगला चाहतावर्ग त्यामुळे निर्माण झाला. तसंच कतरिनाच्या फिल्मी करिअरमध्ये 'टायगर' फ्रँचायझीचा महत्वाचा वाटा आहे. आता कतरिनाला झोया या भूमिकेला घेऊन वेगळी फ्रँचायझी करायची आहे. सलमान खानलाही तिची ही कल्पना आवडली आहे. तसंच दोघांचं YRF सोबत बोलणंही झालं आहे. आता मेकर्स झोयाच्या भूमिकेचा  स्पिन ऑफ घेऊन येण्याची शक्यता आहे. कतरिनाच्या फॅन्ससाठी हे नक्कीच सरप्राईज असणार आहे. ्

कतरिना लवकरच विजय सेतुपतिसोबत 'मेरी ख्रिसमस' सिनेमात दिसणार आहे. श्रीराम राघवन यांच्या या सिनेमात पहिल्यांदाच कतरिना साऊथ इंडस्ट्रीत डेब्यू करत आहे. चाहत्यांनाही ही फ्रेश जोडी पाहण्याची उत्सुकता आहे. १२ जानेवारीला सिनेमात रिलीज होत आहे. 

Web Title: Katrina Kaif leaving tiger franchise she want zoya s character to have separate franchise told to salman khan and YRF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.