भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात चुडा! मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशलचे मुंबईतील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 06:19 PM2021-12-14T18:19:03+5:302021-12-14T18:19:27+5:30

Katrina Kaif and Vicky Kaushal : विमानतळाबाहेर कॅट व विकी पहिल्यांदा हातात हात घालून एकत्र दिसले. अशात या गोड जोडप्याचे फोटो व्हायरल झाले नसतील तर नवल.

Katrina Kaif and Vicky Kaushal hold hands as they return to Mumbai after wedding | भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात चुडा! मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशलचे मुंबईतील फोटो व्हायरल

भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात चुडा! मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस कौशलचे मुंबईतील फोटो व्हायरल

googlenewsNext

कतरिना कैफ (Katrina Kaif ) व विकी कौशल (Vicky Kaushal) हे लव्हबर्ड्स गेल्या 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. या  लग्न सोहळ्याचा थाट पाहून सगळेच थक्क झालेत. राजस्थानात लग्नाच्या आणाभाका घेतल्या आणि कतरिना व विकी लगेच हनीमूनसाठी रवाना झालेत. अर्थात कुठे, ते अद्यापही गुलदस्त्यात आहे. मीनी हनीमून संपला आणि आज संध्याकाळी हे नवदांम्पत्य मुंबईत दाखल झाले. नवीन जोडपं आज मुंबईत येणार, ही खबर आधीच फोटोग्राफर्सला मिळाली होती. त्यामुळे मुंबई एअरपोर्टवर फोटोग्राफर्स अगदी ठाण मांडून बसले होते. अखेर तो क्षण आला. कॅट व विकी दोघंही हातात हात घालून विमानतळावर उतरले.
विमानतळाबाहेर पहिल्यांदा दोघंही हातात हात घालून एकत्र दिसले. अशात या गोड जोडप्याचे फोटो व्हायरल झाले नसतील तर नवल.

यावेळी कतरिनाने पीच कलरचा सुंदर सलवार सूट घातला होता तर विकी क्रिम कलरची शर्ट आणि पॅन्टमध्ये होता. भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात लाल चुडा आणि चेह-यावर नव्या नव्या लग्नानंतरचा ग्लो अशी कतरिना खूपच सुंदर दिसत होती.

यावेळी कतरिना व विकी दोघांनीही मीडियाला एकत्र अशा पोझ दिल्या. विकीच्या हातात हात घालून पोझ देताना कतरिना काहीशी लाजताना दिसली. 

राजस्थानमध्ये रॉयल स्टाईल डेस्टिनेशन वेडिंगचे अनेक फोटो विकी व कतरिनाने शेअर केले आहेत. मेहंदीपासून हळद ते शाही पॅलेसमधील रॉयल फोटोशूटपर्यंतच्या त्यांच्या फोटोंची सध्या जाम चर्चा आहे. लग्नानंतर 10 डिसेंबरला विकी व कॅटचे कुटुंबीय मुंबईला परतले होते. तर कॅट व विकी दोघंही हेलिकॉप्टरमध्ये बसून अज्ञात ठिकाणी हनीमूनला रवाना झाले होते.

Web Title: Katrina Kaif and Vicky Kaushal hold hands as they return to Mumbai after wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.