Throwback : या फोटोमध्ये आहेत कतरिना अन् दीपिका; तुम्ही ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 18:11 IST2021-09-12T18:09:56+5:302021-09-12T18:11:09+5:30
Throwback Photo : सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण या दोघींचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे.

Throwback : या फोटोमध्ये आहेत कतरिना अन् दीपिका; तुम्ही ओळखलंत का?
सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रिटींचे थोबॅक फोटो व्हायरल होत असतात. यात खासकरुन त्यांच्या बालपणीचे किंवा त्यांच्या कॉलेजजीवनातील फोटोंचा समावेश असतो. मात्र, सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण या दोघींचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये या दोन्ही अभिनेत्रींना पहिल्यांदाच एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.
कतरिना आणि दीपिका यांनी एकत्र पाहणं तसं कठीणच आहे. मात्र, मॉडलिंगच्या काळात या दोघा अभिनेत्रींनी एकमेकींसोबत काम केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सोबत सोफी चौधरीदेखील दिसून येत आहे. हा फोटो तीनही अभिनेत्रींच्या मॉडलिंग काळाच्या सुरुवातीचा आहे.
Sakinaka rape case : 'तिचीच चूक असणार!'; हेमांगी कवीने व्यक्त केल्या भावना
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो मार्क जे रॉबिन्सन यांनी शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिना, दीपिका आणि सोफी प्रसिद्ध फॅशन डिझायनर थॉमस जॅकब यांच्या टॉमी हिलफिगरसाठी पोझ देताना दिसून येत आहे. त्यांच्यासोबत अन्य आंतरराष्ट्रीय मॉडेल्सदेखील या फोटोमध्ये झळकल्या आहेत.
"टॉमी हिलफिगरच्या फॅशन शोमधील फोटो. स्टनिंग,फॅब्युलस दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि सोफी चौधरी", असं कॅप्सन मार्क जे यांनी या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये दीपिकाने ट्यूब शेप ब्लॅक कलरचा टॉप आणि जीन्स परिधान केली आहे. तर कतरिना तिच्या पुढे उभी असून तिने ब्राऊन रंगाची पँट परिधान केली आहे. सोबतच सोफी पिंक टॉप आणि ब्ल्यू जीन्समध्ये दिसून येत आहे.
वय केवळ आकडाच! ऐश्वर्या नारकरने केलं बोल्ड फोटोशूट
दरम्यान, हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी या अभिनेत्रींना ओळखलेलं नाही. मात्र, हा फोटो पाहून अनेकांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सध्या दीपिका तिच्या आगामी 'पठाण', 'द इंटर्न' आणि 'फायटर' या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. तर कतरिना लवकरच 'टायगर 3', 'फोन भूत' आणि 'सूर्यवंशी'मध्ये झळकणार आहे