कॅट-दीपिका एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 14:23 IST2016-11-04T14:23:54+5:302016-11-04T14:23:54+5:30
दोन अभिनेत्री एकमेकांच्या कधीच मैत्रिणी असू शकत नाही, हे बॉलीवूडचे निर्विवाद सत्य आहे. मग एकाच व्यक्तीला डेट केलेल्या दोन ...

कॅट-दीपिका एकत्र?
द न अभिनेत्री एकमेकांच्या कधीच मैत्रिणी असू शकत नाही, हे बॉलीवूडचे निर्विवाद सत्य आहे. मग एकाच व्यक्तीला डेट केलेल्या दोन ‘एक्स’ एकत्र कशा येऊ शकतात. आम्ही बोलत आहोत दीपिका पदुकोन आणि कॅटरिना कैफ यांच्याबद्दल.
बॉलीवूडमधील या दोन टॉपच्या अभिनेत्रींना एका चित्रपटात कास्ट करण्याची तयारी दिग्दर्शक आनंद एल. राय करीत असल्याचे कळतेय. त्यांच्या आगामी रोमॅण्टिक चित्रपटात दोघींना घेण्यासाठी सध्या त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. परंतु त्या होकार देतील का? हा मोठा प्रश्न आहे.
कारण दोघींचा एक्स-बॉयफ्रेंड एकच होता. तो म्हणजे रणबीर कपूर. दीपिका-रणबीरचे ब्रेक -अप झाल्यानंतर त्याच्या जीवनात कॅटची एन्ट्री झाली. पुढील वर्षी ते लग्न करणार इथपर्यंत चर्चा गेली होती. मात्र, तसे काही होऊ शकले नाही. कॅटसोबतही त्याचे ब्रेक अप झाले.
आता रणबीरसोबत असणारा प्रेम इतिहास पाहता दोघी एकमेंकीसोबत काम करण्यास किती उत्सुक असतील याविषयी शंका आहे. तसे पाहिले गेले तर, आनंद राय एक उत्तम दिग्दर्शक असून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी त्या गमावणार नाही अशी अपेक्षा आहे.