karwa chauth 2018 : या बॉलिवूड गाण्यांशिवाय करवा चौथचे सेलिब्रेशन अशक्यच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 05:30 PM2018-10-27T17:30:22+5:302018-10-27T17:42:31+5:30

करवा चौथ आणि बॉलिवूड यांचे खूपच जवळचे नाते आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. करवा चौथच्या सणांवर आधारित अनेक गाणी बॉलिवूडमध्ये असून ही गाणी कोणती ते आपण जाणून घेऊया...

karwa chauth 2018 : Bollywood Best Song Of karwa chauth | karwa chauth 2018 : या बॉलिवूड गाण्यांशिवाय करवा चौथचे सेलिब्रेशन अशक्यच

karwa chauth 2018 : या बॉलिवूड गाण्यांशिवाय करवा चौथचे सेलिब्रेशन अशक्यच

googlenewsNext

आज करवा चौथ असून अनेक पत्नींनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास केलेला आहे. आजकाल अनेक पती देखील आपल्या पत्नीसोबत उपवास करताना दिसतात. करवा चौथच्या निमित्ताने बायका हातावर मेहेंदी काढतात. एखाद्या नववधूप्रमाणेच त्या सजतात. आजपर्यंत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला करवा चौथ हा सण पाहायला मिळाला आहे. करवा चौथ आणि बॉलिवूड यांचे खूपच जवळचे नाते आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. करवा चौथच्या सणांवर आधारित अनेक गाणी बॉलिवूडमध्ये असून ही गाणी कोणती ते आपण जाणून घेऊया...

हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील चाँद छुपा बादल में हे गाणे करवा चौथच्या सणावर असून हे गाणे चांगलेच गाजले होते. आजही या गाण्याची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या गाण्यात आपल्याला सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळते. या गाण्याचे बोल रसिकांना प्रचंड आवडतात. 

कभी खुशी कभी गम या चित्रपटातील लैजा लैजा हे गाणे रसिकांचे प्रचंड आवडते असून या गाण्यात हृतिक रोशन, करिना कपूर, काजोल आणि शाहरुख खान यांचे बहारदार नृत्य पाहायला मिळते. 

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाची सगळीच गाणी रसिकांची प्रचंड आवडती आहेत. या चित्रपटातील घर आजा परदेसी या गाण्यात देखील करवा चौथ या सणाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. काजोल, शाहरुख खान यांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

आशिक आवारा या नवव्दीच्या दशकातील चित्रपटातील चांद और पिया हे गाणे प्रसिद्ध असून या गाण्यात देखील आपल्याला करवा चौथच्या सणाचे सेलिब्रेशन पाहायला मिळते.

जहर या चित्रपटातील अगर तुम मिल जाओ, जमाना छोड देंगे हम हे जहेर या चित्रपटातील गाण्यात देखील काही करवा चौथची दृश्यं आहेत. हे गाणे इम्रान हाश्मी, उदिता गोस्वामी आणि शमिता शेट्टी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले आहे. 

Web Title: karwa chauth 2018 : Bollywood Best Song Of karwa chauth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.