Shehzada : परेश रावल यांच्या कानाखाली मारताना कार्तिकची झाली फजिती, सांगितलं कसा शूट झाला सीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 05:15 PM2023-01-13T17:15:59+5:302023-01-13T17:17:18+5:30

अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी शहजादा सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. यातील कार्तिकचा अॅक्शन अवतार बघून चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता आहे.

kartik aryan slaps paresh rawal reveals how that particular scene was shot | Shehzada : परेश रावल यांच्या कानाखाली मारताना कार्तिकची झाली फजिती, सांगितलं कसा शूट झाला सीन

Shehzada : परेश रावल यांच्या कानाखाली मारताना कार्तिकची झाली फजिती, सांगितलं कसा शूट झाला सीन

googlenewsNext

Shehzada :  अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) आगामी शहजादा सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. यातील कार्तिकचा अॅक्शन अवतार बघून चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता आहे. सिनेमातपरेश रावल (Paresh Rawal) देखील मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान एका सीनमध्ये कार्तिकला परेश रावल यांच्या कानाखाली मारायचे होते. तो सीन करताना कार्तिकची कशी फजिती झाली हे त्याने एका मुलाखतीत उलगडले आहे.

कार्तिकने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला, 'एका सीनमध्ये परेश सरांच्या मला कानाखाली मारावे लागणार होते. तेव्हा मी खूप नर्व्हस झालो होतो. मात्र परेश सर हे खूप चांगले आहेत. त्यांनी मला कंफर्टेबल केले आणि तू तुझ्या भूमिकेचाच विचार आणि तसाच अभिनय कर असे सांगितले. '

तो पुढे म्हणाला, 'परेश सरांच्या मदतीमुळे मला तो सीन करणे शक्य झाले. असे सीन करताना ते एका विशिष्ट पद्धतीने शूट केले जातात. यावेळी प्रत्यक्ष गालावर चापट मारली जात नाही मात्र तरी ते आपल्याला बघताना खरे वाटते. यासाठी सहकलाकारांमध्ये विश्वास असण्याची गरज आहे. परेश रावल हे कॉमिक टायमिंगचे राजा आहेत. '

 कार्तिक 'शहजादा'मधून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे.  'शहजादा' मध्ये कार्तिक आर्यनशिवाय बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon) आणि मनीषा कोईराला (Manisha Koirala) मुख्य भूमिकेत आहेत.  'शहजादा' हा चित्रपट 10 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: kartik aryan slaps paresh rawal reveals how that particular scene was shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.