बॉलिवूड बालांना टक्कर देणार कार्तिक आर्यनची ‘स्कूलवाली गर्लफ्रेन्ड’, जाणून घ्या कोण आहे ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 08:00 IST2020-01-30T08:00:00+5:302020-01-30T08:00:02+5:30

नुकताच ‘लव्ह आज कल 2’चा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरमधील सारा व कार्तिकच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. याशिवाय आणखी एक चेहरा प्रेक्षकांच्या डोळ्यात भरला. ती म्हणजे, कार्तिकची ‘स्कूलवाली गर्लफ्रेन्ड’.

kartik aryan onscreen girlfriend love aaj kal actress arushi sharma know about her | बॉलिवूड बालांना टक्कर देणार कार्तिक आर्यनची ‘स्कूलवाली गर्लफ्रेन्ड’, जाणून घ्या कोण आहे ती

बॉलिवूड बालांना टक्कर देणार कार्तिक आर्यनची ‘स्कूलवाली गर्लफ्रेन्ड’, जाणून घ्या कोण आहे ती

ठळक मुद्देआरूषी सोशल मीडियावर फार अ‍ॅक्टिव्ह नाही. साहजिकच तिचे फॉलोअर्स फार नाहीत.

कार्तिक आर्यनसारा अली खान यांचा ‘लव्ह आज कल 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होतोय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरमधील सारा व कार्तिकच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. याशिवाय आणखी एक चेहरा प्रेक्षकांच्या डोळ्यात भरला. ती म्हणजे, कार्तिकची ‘स्कूलवाली गर्लफ्रेन्ड’.


होय, ‘लव्ह आज कल 2’मध्ये साराशिवाय आणखी एक अभिनेत्री आहे. तिचे नाव आरूषी शर्मा. आरूषीने या चित्रपटात कार्तिकच्या शाळेतील गर्लफ्रेन्डची भूमिका साकारली आहे. आरूषीचा हा डेब्यू सिनेमा असेल, असे तुम्हाला वाटेल. पण असे नाहीये.

होय, कारण यापूर्वी अनेक सिनेमात आरूषी झळकली आहे. 2015 मध्ये इम्तियाज अलीच्याच ‘तमाशा’ या सिनेमात आरूषीने रणबीर कपूरच्या टीचरची भूमिका साकारली होती. अर्थात त्यावेळी आरूषीला फार कुणी नोटीस केले नाही. पण आता ‘लव्ह आज कल 2’मुळे ती जाम चर्चेत आहे.   ही आरूषी कोण, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


आरूषी ही बिहारची राहणारी आहे. बिहारच्या प्रकाश युनिव्हर्सिटीतून तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आणि ती अ‍ॅक्टिंगकडे वळली. ‘तमाशा’शिवाय ‘लिटील थिंग्स’ या सिनेमातही तिने काम केलेय.

आरूषी सोशल मीडियावर फार अ‍ॅक्टिव्ह नाही. साहजिकच तिचे फॉलोअर्स फार नाहीत. एक सामान्य आयुष्य जगणारी, सामान्य मुलगी अशी तिची ओळख आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहायला तिला आवडते. फिरण्याचाही तिला छंद आहे.

Web Title: kartik aryan onscreen girlfriend love aaj kal actress arushi sharma know about her