'पति, पत्नी और वो' सिनेमाची रिलीज डेट आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 12:48 IST2019-02-26T12:26:31+5:302019-02-26T12:48:53+5:30

कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या सिनेमा 'पति, पत्नी और वो'ची रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.  सध्या या सिनेमाची शूटिंग सुरु आहे.

kartik aryan bhumi pednekar and ananya pandey film pati patni aur woh release date out | 'पति, पत्नी और वो' सिनेमाची रिलीज डेट आऊट

'पति, पत्नी और वो' सिनेमाची रिलीज डेट आऊट

ठळक मुद्देपति, पत्नी और वो  10 जानेवारी 2020 ला रिलीज होणार आहे

कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या सिनेमा 'पति, पत्नी और वो'ची रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.  सध्या या सिनेमाची शूटिंग सुरु आहे. ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून या गोष्टीची माहिती दिली. पति, पत्नी और वो  10 जानेवारी 2020 ला रिलीज होणार आहे.   



रिमेकमधील कथेची मांडणीही याच अंगाने जाणारी असल्याचे दिग्दर्शक मुदस्सर अझीम यांनी सांगितले होते. या कथेला आताच्या ट्रेंड्नुसार नवीन लूक देण्यात येणार आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार, जुनो चोप्रा व अभय चोप्रा करणार आहेत. हा सिनेमा १९७८ साली प्रदर्शित झालेला 'पति पत्नी और वो'चा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेते संजीव कुमार मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबत विद्या सिन्हा व रंजीता कौरदेखील मुख्य भूमिकेत होते आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन बलदेव राज चोप्रा यांनी केले होते. 'पती पत्नी और वो' चित्रपटात तो लखनऊच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. 'चिंटू त्यागी' असे त्याचे नाव असणार आहे. कार्तिकचा हा अनोखा अंदाज रुपेरी पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे.


कार्तिकचा लुका छिपी चित्रपट १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि यात त्याच्यासोबत अभिनेत्री कृति सेनॉन झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत.

Web Title: kartik aryan bhumi pednekar and ananya pandey film pati patni aur woh release date out