काश्मीरमध्ये 'या' अभिनेत्रीसोबत दिसला कार्तिक आर्यन, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:50 IST2026-03-30T12:49:03+5:302026-03-30T12:50:28+5:30

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.

Kartik Aaryan Sreeleela Tu Meri Zindagi Hai Shooting Kashmir Leaked Photos Anurag Basu | काश्मीरमध्ये 'या' अभिनेत्रीसोबत दिसला कार्तिक आर्यन, फोटो व्हायरल

काश्मीरमध्ये 'या' अभिनेत्रीसोबत दिसला कार्तिक आर्यन, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींशी त्याचं नावही जोडलं गेलं होतं. याशिवाय कार्तिक आर्यनला अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत हँग आउट करताना पाहिलं गेलं आहे. पण कार्तिक आर्यनने त्याच्या रिलेशनशिप किंवा लव्ह लाइफबद्दल फार क्वचितच भाष्य केलं आहे. नुकतंच कार्तिकला काश्मीरमध्ये एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत पाहिलं गेलं. दोघांचे फोटोही व्हायरल झाले आहेत. 

तर ती अभिनेत्री आहे श्रीलीला. निखळ सौंदर्य, अभिनय आणि अप्रतिम डान्समुळं श्रीलीला चाहत्यांच्या मनावर राज्य करते. नुकतंच श्रीलीला आणि कार्तिक यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांमध्ये या भेटीबाबत उत्सुकता वाढली आहे. नेमकी ही शूटिंगसाठीची भेट आहे की काही खास कारण, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. तर समोर आलेल्या माहितीनुसार दोघांचे हे फोटो चित्रपटाच्या सेटवरील आहेत.

श्रीलीला आणि कार्तिक यांचे चित्रपटाचं शेड्युल सध्या अंतिम टप्प्यात आहे. चित्रपटातील गाणी आणि काही महत्त्वाचे रोमँटिक प्रसंग काश्मिरमध्ये शूट केले जात आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये कार्तिक आर्यन लांब केस आणि दाढी असलेल्या लूकमध्ये दिसतोय. तर दुसरीकडे, श्रीलीला निळ्या रंगाचा टॉप, 'रिप्ड जीन्स' आणि डोक्यावर लाल रंगाची टोपी अशा अंदाजात दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत हे दोन्ही कलाकार दिग्दर्शक अनुराग बसू यांच्याशी गंभीर चर्चा करताना दिसत आहेत.


'आशिकी ३' नाही, तर 'तू मेरी जिंदगी है'
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा तो 'आशिकी ३' असेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, निर्मात्यांनी स्पष्ट केले की हा चित्रपट 'आशिकी' फ्रँचायझीचा भाग नाही. या म्युझिकल-रोमँटिक ड्रामामध्ये कार्तिक आणि श्रीलीलाची फ्रेश केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते आता कमालीचे आतुर झाले आहेत.

Web Title : कश्मीर में कार्तिक आर्यन 'इस' अभिनेत्री के साथ दिखे, तस्वीरें वायरल

Web Summary : कार्तिक आर्यन और श्रीलीला की कश्मीर की तस्वीरें वायरल, डेटिंग की अफवाहें उड़ीं। वे एक फिल्म की शूटिंग कर रहे हैं, जिसमें रोमांटिक दृश्य फिल्माए जा रहे हैं। कार्तिक लंबे बालों में हैं, जबकि श्रीलीला नीले टॉप और रिप्ड जींस में हैं। फिल्म, जिसके बारे में शुरू में अफवाह थी कि यह 'आशिकी 3' है, वास्तव में 'तू मेरी जिंदगी है' है।

Web Title : Kartik Aaryan spotted with Sreeleela in Kashmir; photos go viral

Web Summary : Kartik Aaryan and Sreeleela's Kashmir photos went viral, sparking dating rumors. They are shooting a movie, with romantic scenes being filmed. Kartik sports long hair, while Sreeleela wears a blue top and ripped jeans. The film, initially rumored to be 'Aashiqui 3,' is actually 'Tu Meri Zindagi Hai.'