रूमर्ड गर्लफ्रेंडची कार्तिकसाठी बर्थडे पोस्ट! खास फोटो शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 12:52 IST2025-11-23T12:52:03+5:302025-11-23T12:52:18+5:30
कार्तिकसाठी तिने सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. तिने कार्तिकसोबतचा एक फोटो शेअर केलाय.

रूमर्ड गर्लफ्रेंडची कार्तिकसाठी बर्थडे पोस्ट! खास फोटो शेअर करत म्हणाली...
बॉलिवूडचा 'शहजादा' अर्थात अभिनेता कार्तिक आर्यनचा आज वाढदिवस आहे. चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालाय. पण, सर्वांचं लक्ष वेधलं ते एका व्यक्तीच्या खास शुभेच्छांनी. कार्तिक आर्यनची 'रुमर्ड गर्लफ्रेंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीने त्याच्यासाठी एक अत्यंत खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसोबतच तिने कार्तिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या खास शुभेच्छांमुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
ती आहे साऊथची लोकप्रिय अभिनेत्री श्रीलीला. कार्तिकसाठी तिने सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. तिने कार्तिकसोबतचा एक फोटो शेअर केलाय. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, स्वीटेस्ट!! सेलिब्रेशन म्हणजे फक्त ब्लर झालेले फोटोच!". श्रीलीलानं पोस्ट केलेल्या फोटोवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.
श्रीलीला आणि कार्तिक आर्यन हे दोघं खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही. याविषयी त्या दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच याबाबतची हींट कार्तिकच्याच आईने दिल्याचं म्हटलं जात आहे. कार्तिकची आई माला यांनी जयपुरमध्ये एका अवॉर्ड शोमध्ये त्यांच्या रिलेशनशिपवर हिंट दिली. जेव्हा त्यांना त्यांच्या होणाऱ्या सुनेविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की कुटुंबाला एक चांगली डॉक्टर पाहिजे. त्यानंतर सगळे श्रीलीलाविषयी बोलू लागले कारण ती अभिनेत्री असण्यासोबत तिनं मेडिकलमध्ये शिक्षण केलं आहे. दरम्यान, श्रीलीला आणि कार्तिक पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. अनुराग बसूच्या चित्रपटात ही जोडी दिसणार आहे.