Kartik Aaryan: कार्तिक आर्यनच्या आईनं केली कॅन्सरवर मात, अभिनेत्याने लिहिली भावूक पोस्ट, वाचून डोळ्यांत येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 13:41 IST2023-05-06T13:30:52+5:302023-05-06T13:41:57+5:30

कार्तिक आर्यनची आई माला तिवारी गेल्या यांनी कॅन्सवर मात केली आहे. गेल्या ५ वर्षांपासून त्या या आजाराशी झुंज देत होत्या.

kartik aaryan mother mala tiwari battle from breast cancer and defeat it actor shared a motivational emotional post | Kartik Aaryan: कार्तिक आर्यनच्या आईनं केली कॅन्सरवर मात, अभिनेत्याने लिहिली भावूक पोस्ट, वाचून डोळ्यांत येईल पाणी

Kartik Aaryan: कार्तिक आर्यनच्या आईनं केली कॅन्सरवर मात, अभिनेत्याने लिहिली भावूक पोस्ट, वाचून डोळ्यांत येईल पाणी

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)ची आई गेल्या २-३ वर्षांपासून कॅन्सरशी लढत होती, ज्यावर तिने विजय मिळवला आहे. कार्तिकने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने सांगितले की त्याच्या आईने कॅन्सरवर मात केली आहे.  कार्तिकने त्याच्या आईसोबतचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे. त्याने सांगितले की, जेव्हा घरातील सर्वांना कळले की आईला कॅन्सर आहे, तेव्हा तो आणि त्यांचं कुटुंब हताश आणि निराश झालं होतं. पण आईच्या इच्छाशक्तीने आणि धैर्याने कॅन्सरला हरवले.

फोटो शेअर करताना, कार्तिक आर्यनने लिहिले, "काही वेळापूर्वी या महिन्यात बिग सी - 'कॅन्सर'ने गुपचूप प्रवेश केला आणि आमच्या कौटुंबिक उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला! आम्ही हतबल आणि असहाय होतो! पण त्या निडर सैनिकाचे आभार- माझ्या आईची इच्छाशक्ती, जिद्द जिने कधीही हार मानली नाही. पूर्ण 'धैर्य'ने तिने ही लढाई जिंकली. विजय आधीच ठरलेला होता.

कार्तिक आर्यनने पुढे लिहितो की, "शेवटी,  यातून आम्हाला जे शिकवले आणि दररोज शिकवत आहे, ते म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या प्रेम आणि पाठिंब्यापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही!" कार्तिकच्या या पोस्टवर विकी कौशल, कपिल शर्मा, आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, एकता कपूर या सेलिब्रिटींनी  पोस्टला कमेंट केली आहे. 

कार्तिक आर्यनने गेल्या वर्षी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो कॅन्सरग्रस्तांसोबत वेळ घालवताना दिसत होता. तो राष्ट्रीय कॅन्सर जनजागृती मोहिमेत सामील होता आणि आई माला तिवारी यांना स्तनाचा कॅन्सर झाल्याबद्दल बोलले. त्याने सांगितले की त्याची आई गेल्या ५ वर्षांपासून कॅन्सरशी लढत होती.
 

Web Title: kartik aaryan mother mala tiwari battle from breast cancer and defeat it actor shared a motivational emotional post