'चंदू चँपियन'मध्ये मराठी बोलताना दिसणार कार्तिक आर्यन! भाषा शिकण्यासाठी घेतली तब्बल १४ महिने मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 13:36 IST2024-04-03T13:35:48+5:302024-04-03T13:36:54+5:30

'चंदू चँपियन'मध्ये कार्तिक आर्यनचा मराठमोळा अंदाज, मराठी भाषा बोलण्यासाठी प्रयत्नशील. केली ही खास गोष्ट, वाचा बातमी

Kartik Aaryan learn marathi language for Chandu Champion movie by kabir khan | 'चंदू चँपियन'मध्ये मराठी बोलताना दिसणार कार्तिक आर्यन! भाषा शिकण्यासाठी घेतली तब्बल १४ महिने मेहनत

'चंदू चँपियन'मध्ये मराठी बोलताना दिसणार कार्तिक आर्यन! भाषा शिकण्यासाठी घेतली तब्बल १४ महिने मेहनत

कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. 'प्यार का पंचनामा',  'भूल भूलैय्या', 'लव्ह आज कल' अशा अनेक सिनेमांमधून कार्तिकने बॉलिवूडमध्ये स्वतःची छाप पाडली. कार्तिक सध्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. कार्तिकचा सध्या बहुचर्चित सिनेमा म्हणजे 'चंदू चँपियन'.  'चंदू चँपियन' साठी कार्तिक खुप मेहनत घेतोय. विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमात कार्तिकचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळणार आहे.

'चंदू चँपियन' साठी कार्तिक आजवर कधीही न पाहिलेल्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. भूमिका परफेक्ट व्हावी म्हणून कार्तिक स्वतःवर खुप मेहनत घेतोय. विशेष म्हणजे कार्तिक 'चंदू चँपियन' सिनेमात मराठी बोलताना दिसणार आहे. यासाठी तब्बल १४ महिने कार्तिकने मराठी भाषा शिकण्यासाठी कष्ट घेतले आहेत.  कार्तिकला या काळात मराठी भाषा शिकवण्यासाठी प्राध्यापक नेमण्यात आले असून ते पूर्णवेळ कार्तिकसोबत होते.

अशाप्रकारे प्राध्यापकांकडून मराठी भाषा शिकण्यासाठी कार्तिक त्याचे १०० टक्के प्रयत्न करतोय. आता कार्तिक मराठी भाषा कशी बोलणार, यासाठी प्रेक्षकांना अजून काही वेळ वाट पाहावी लागेल. साजिद नाडियादवाला आणि कबीर खान निर्मित 'चंदू चँपियन' सिनेमा १४ जून २०२४ रोजी सिनेमागृहात रिलीज होईल. 'बजरंगी भाईजान' फेम कबीर खान या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय.

Web Title: Kartik Aaryan learn marathi language for Chandu Champion movie by kabir khan