किस्सा : कार्तिक आर्यनसाठी डोकेदुखी ठरला होता किसींग सीन, एका शॉटसाठी द्यावे लागले होते ३७ रीटेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:22 IST2021-12-30T13:21:58+5:302021-12-30T13:22:56+5:30
Kartik Aaryan : आर्यन पडद्यावर रोमॅंटिक सीन करताना कधीही नाही घाबरत, पण एकदा त्याला किसींग सीनसाठी ३७ रीटेक द्यावे लागले होते. हे करताना तो वैतागला होता.

किस्सा : कार्तिक आर्यनसाठी डोकेदुखी ठरला होता किसींग सीन, एका शॉटसाठी द्यावे लागले होते ३७ रीटेक
अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याने फारच कमी दिवसात बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'प्यार का पंचनामा' सिनेमाने तो रातोरात स्टार झाला होता. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. कार्तिक आर्यन पडद्यावर रोमॅंटिक सीन करताना कधीही नाही घाबरत, पण एकदा त्याला किसींग सीनसाठी ३७ रीटेक द्यावे लागले होते. हे करताना तो वैतागला होता.
कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) ने सुभाष घई दिग्दर्शित 'कांची: अनब्रेकेबल' मध्ये काम केलं होतं. या सिनेमात त्याला सिनेमाची अभिनेत्री मिष्टीसोबत एक किसींग सीन करायचा होता. या घटनेचा खुलासा कार्तिकने एका मुलाखतीदरम्यान केला होता.
एका किसींग सीनचे द्यावे लागले होते ३७ रीटेक
फिल्मफेअरसोबत बोलताना कार्तिक आर्यनने सांगितलं होतं की, सिनेमात एका सीनमध्ये सुभाषजींना एक पॅशनेट किस हवा होता आणि मला किस करणं येत नव्हतं. मी त्यांना विचारणार होतो की, सर तुम्हीच करून दाखवा. मी कधीही विचार नव्हता केला की, किसींग सीन इतका डोकेदुखीचाही असू शकतो. त्या दिवशी आम्ही लव्हर्ससारखे वागत होतो. अखेर सुभाषजींना हवा तसा शॉट आम्ही दिला. ते खूश झाले. पण मिष्टीसोबत किसींग सीन करताना मला ३७ रीटेक द्यावे लागले होते.
कार्तिकचे सिनेमे
वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर कार्तिक आर्यन 'धमाका' सिनेमात दिसला होता. यात त्याने स्टार न्यूज अॅंकरची भूमिका साकारली होती. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. यात तो अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत दिसला होता. आता कार्तिक 'भूल भुलैया 2', 'कॅप्टन इंडिया' और 'शहजादा' सिनेमात दिसणार आहे.