Kartik Aaryan: कार्तिक आर्यन बनला शाहिद कपूरचा भाडेकरू, महिन्याचं भाडं वाचून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 14:02 IST2023-01-19T13:48:47+5:302023-01-19T14:02:59+5:30
Kartik Aaryan Becomes Shahid Kapoor's Tenant: होय, शाहिद कपूरच्या मालकीच्या जुहू येथील घरात कार्तिक शिफ्ट होतोय. कार्तिकने हे घर भाड्यानं घेतलं आहे...

Kartik Aaryan: कार्तिक आर्यन बनला शाहिद कपूरचा भाडेकरू, महिन्याचं भाडं वाचून थक्क व्हाल!
Kartik Aaryan Becomes Shahid Kapoor's Tenant: कार्तिक आर्यनबॉलिवूडचा टॉपचा अभिनेता आहे. गेल्यावर्षी रिलीज झालेला कार्तिकचा भुलभुलैय्या २ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. साहजिकच कार्तिकचे भाव गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढले आहेत. सध्या त्याच्या हातात अनेक बडे सिनेमे आहेत. तर हाच कार्तिक गेल्या अनेक दिवसांपासून एका सुंदर घराच्या शोधात होता. अखेर त्याचा शोध संपलाये. होय, शाहिद कपूरच्या मालकीच्या जुहू येथील घरात कार्तिक शिफ्ट होतोय. कार्तिकने हे घर भाड्यानं घेतलं आहे. अर्थातच घराचं महिन्याचं भाडं वाचून तुमचे डोळे पाढंरे होतील.
कार्तिक सध्या जुहूतच आपल्या कुटुंबासोबत भाड्यानं राहतोय. त्याचं हे घर अनिल कपूरच्या बंगल्याच्या अगदी जवळ आहे. पण कार्तिकला जुहूत एक सी फेसिंग डुप्लेक्स हवं होतं. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, कार्तिकने काही दिवसांपूर्वी शाहिदचं जुहू तारा मार्गावरच्या प्रनेता बिल्डींगमधील घर पाहायला गेला होता. या घरात शाहिद व मीरा आधी राहायचे. तर हे घर कार्तिक व त्याची आई दोघांनाही आवडलं आणि आता कार्तिकने हे घर भाड्यानं घेतलं आहे.
Zapkey डाक्युमेंट्सच्या वृत्तानुसार, कार्तिकने तीन वर्षांसाठी शाहिदचं घर भाड्यानं घेतलं आहे. या घरासाठी त्याने ४५ लाख रूपयांचं सिक्युरिट डिपॉझिट भरलं. करारपत्रानुसार, कार्तिक शाहिदला एक वर्षापर्यंत दर महिन्याला ७.५० लाख भाडं देईल. दुसऱ्या वर्षी ७ टक्के भाडेवाढ होईल. म्हणजेच, कार्तिकला दुसऱ्या वर्षापासून दरमहा ८.२० लाख माेजावे लागतील. तिसऱ्या वर्षी भाड्याची रक्कम वाढून ८.५८ लाख होईल. कार्तिकने भाड्यानं घेतलेलं घर ३६८१ चौ. फूट एरियात पसरलेलं आहे.
शाहिद अलीकडे जुहूतील हे घर सोडून प्रभादेवी भागातील ड्युप्लेक्स अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला. २०१८ साली शाहिद व मीराने ८६२५ स्क्वेअर फूटांचं हे घर खरेदी केलं होतं. यासाठी त्याने ५५.६० कोटी रूपये मोजले होते.