कार्तिक-अनन्याचा 'तू मेरी में तेरा...' OTT वर झाला प्रदर्शित, कुठे पाहता येईल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 16:30 IST2026-02-22T16:29:31+5:302026-02-22T16:30:11+5:30
'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' आता चाहते घरबसल्या पाहू शकतात.

कार्तिक-अनन्याचा 'तू मेरी में तेरा...' OTT वर झाला प्रदर्शित, कुठे पाहता येईल?
बॉक्स ऑफिसवर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक जण तो चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार या प्रतीक्षेत असतात. तर काही जण थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणं शक्य नसल्यानं ओटीटीवर तो कधी रीलीज होणार याची वाट पाहत असतात. अशातच आता नुकताच अजून एक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' आता चाहते घरबसल्या पाहू शकतात.
'तू मेरी में तेरा...' २५ डिसेंबर २०२५ रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र यश मिळाले. मात्र, आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर आला आहे. सुरुवातीला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'रेंट' (भाड्याने) उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, आता अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) वर हा चित्रपट सर्व सदस्यांसाठी मोफत उपलब्ध झाला आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी आजच्या काळातील रिलेशनशिपवर भाष्य करणारी ही कथा मांडली आहे. या चित्रपटात केवळ कार्तिक आणि अनन्याच नाही, तर दिग्गज कलाकार नीना गुप्ता, जॅकी श्रॉफ, टिकू तलसानिया हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. थिएटरमध्ये हा चित्रपट पाहणे राहून गेले असेल, तर आता कार्तिक-अनन्याची ही केमिस्ट्री अनुभवायची उत्तम संधी प्रेक्षकांना मिळाली आहे.