कार्तिक आर्यनने त्याच्या चाहत्याचा स्पेशल दिवस अशारितीने बनवला अविस्मरणीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 16:01 IST2020-04-24T16:01:11+5:302020-04-24T16:01:58+5:30

कार्तिक आर्यन आपल्या चाहत्यांना कधीच नाराज करत नाही.

Karthik Aryan made his fan day unforgettable TJL | कार्तिक आर्यनने त्याच्या चाहत्याचा स्पेशल दिवस अशारितीने बनवला अविस्मरणीय

कार्तिक आर्यनने त्याच्या चाहत्याचा स्पेशल दिवस अशारितीने बनवला अविस्मरणीय

आयुष्यातील प्रत्येक स्पेशल दिवस म्हणजे वाढदिवस असो किंवा अॅनिव्हर्सरी सर्वांसाठी स्पेशल असतो. त्यात जर आपल्या आवडत्या चाहत्याने त्या दिवशी शुभेच्छा दिल्या तर तो दिवस आणखीनच स्पेशल बनतो. असेच काहीसे कार्तिक आर्यनच्या एका फॅनसोबत झाले आहे. कार्तिक आर्यन नेहमी आपल्या चाहत्यांच्या विनंती पूर्ण करतो. त्यामुळे तो लोकांचा फेव्हरिट आहे.

नुकतेच एका व्यक्तिने कार्तिकला ट्विट करत विनंती केली होती की, आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्याची पत्नी अनुपमा त्याची खूप मोठी चाहती आहे. त्यामुळे कृपया एकदा शुभेच्छा द्या. लॉकडाउनमुळे काहीच प्लान करू शकलो नाही. यावर कार्तिकने खूप प्रेमाने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि लॉकडाउनच्या नियमाचे पालन केल्यामुळे कौतूकही केले. अशाप्रकारे त्या जोडप्यांच्या लग्नाचा वाढदिवस आणखीन स्पेशल केला.

लॉकडाउनमुळे घरात कैद असलेला कार्तिक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे आणि त्यासोबतच जनजागृतीदेखील करत आहे.

तसेच या लॉकडाउन दरम्यान त्याने युट्यूबवर सुरू केलेली कोकी पुछेगा या सीरिजला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या शोमधून देखील कार्तिक कोरोना व्हायरससंदर्भात लोकांना माहिती देतो आहे.

Web Title: Karthik Aryan made his fan day unforgettable TJL