करीना-क्रिती-तब्बूचा 'क्रू' सिनेमा 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 04:00 PM2024-05-21T16:00:52+5:302024-05-21T16:07:25+5:30

चित्रपटगृहांनंतर आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Kareena-Kriti-Tabu's 'Crew' to release on Netflix on this day Know Date | करीना-क्रिती-तब्बूचा 'क्रू' सिनेमा 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या तारीख

करीना-क्रिती-तब्बूचा 'क्रू' सिनेमा 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या तारीख

Crew Movie OTT : अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि तब्बू (Tabu) यांची प्रमुख भूमिका असलेला 'क्रू' (Crew)  29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. एअर होस्टेसची ही कथा प्रेक्षकांच्या देखील खूप पसंतीस पडली.  'क्रू'सिनेमाने फक्त  देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर जगभरात चांगला व्यवसाय केला.  चित्रपटगृहांनंतर आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

'क्रू' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटगृहात बघायची संधी हुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता हा सिनेमा ओटीटीवर दाखल होणार आहे. हा सिनेमा येत्या 24 मे रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर वर प्रदर्शित होणार आहे. राजेश कृष्णन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अनिल कपूर, शोभा कपूर, एकता कपूर आणि रिया कपूर यांनी बालाजी टेलिफिल्म्स, AKFC आणि कम्युनिकेशन नेटवर्क प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या बॅनरखाली केली आहे.  या सिनेमात कपिल शर्मा, दिलजीत दोसांझ आणि खेसारी लाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

विमानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'क्रू' मेंबर म्हटले जाते. या चित्रपटात एका दिवाळखोर विमान कंपनीत काम करणाऱ्या तीन तरुणींची कथा सांगण्यात आली आहे, म्हणून चित्रपटाचे नाव  'क्रू' असं आहे.  खुर्चीला खिळवून ठेवणारा सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात सिनेमाची टीम यशस्वी झाली आहे. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहिला आहे, ते OTT वर पुन्हा त्याचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत.

Web Title: Kareena-Kriti-Tabu's 'Crew' to release on Netflix on this day Know Date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.