करिना-करिश्मा झाल्या आत्या, अरमान आणि अनीसा झाले आई-बाबा; कपूर कुटुंबात चिमुकल्याचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 14:15 IST2023-04-24T13:52:34+5:302023-04-24T14:15:15+5:30

रणबीर, आलिया, रिद्धिमा, करिश्मा हे सगळेच कुटुंबात चिमुकल्या सदस्याच्या आगमनाने खूप उत्सुक आहेत.

kareena karishma kapoors cousin armaan jain welcomes baby boy with anissa malhotra | करिना-करिश्मा झाल्या आत्या, अरमान आणि अनीसा झाले आई-बाबा; कपूर कुटुंबात चिमुकल्याचं आगमन

करिना-करिश्मा झाल्या आत्या, अरमान आणि अनीसा झाले आई-बाबा; कपूर कुटुंबात चिमुकल्याचं आगमन

करिना कपूर आणि करिश्मा कपूरचा चुलत भाऊ अरमान जैन बाबा झाला आहे. अरमानची पत्नी अनीसा मल्होत्रा ​​हिने २३ एप्रिलला गोंडस बाळाला जन्म दिला. यामुळे संपूर्ण कपूर कुटुंब खूप उत्सुक आहे. या बातमीनंतर आत्या करिश्मा, करिनापासून आजी रीमा आणि नीतू कपूरपर्यंत सगळेच आनंदात आहेत. रिमा जैन यांना अरमान आणि आदर ही दोन मुले आहेत. अरमान आणि अनिसा यांचे २०२० मध्ये लग्न झाले. अनिसासाठी बेबी शॉवर पार्टीही आयोजित करण्यात आली होती.

चिमुकल्याच्या आगमनामुळे अरमान आणि अनीसाचा आनंद गगनात मावत नाही. नीतू कपूरने यांना हा आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. आई-बाबा झालेल्या अरमान आणि अनीसावर सोशल मीडियावर अभिनंदनचा वर्षाव करण्यात येतोय.  


रणबीर, आलिया, रिद्धिमा, करिश्मा हे सगळेच कुटुंबातील नवीन सदस्याच्या आगमनाने खूप उत्सुक आहेत. अरमान देखील अभिनय जगताचा एक भाग आहे. त्याने 2014 साली 'लेकर हम दिवाना दिल' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. अभिनय विश्वात येण्यापूर्वी अरमानने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्याने 'एक मैं और एक तू' आणि 'स्टुडंट ऑफ द इयर' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

Web Title: kareena karishma kapoors cousin armaan jain welcomes baby boy with anissa malhotra