करीना कपूरचे बरेच सीक्रेट्स आले समोर, सैफला पहिल्यांदा शर्टलेस पाहिले तेव्हा अभिनेत्रीची होती ही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 20:43 IST2023-12-28T20:43:04+5:302023-12-28T20:43:35+5:30

Kareena Kapoor-Saif Ali Khan : करीना कपूरने स्वतः शोमधील एका सरप्राईज व्हिडिओद्वारे तिचे सीक्रेट ओपन केले. सासू शर्मिला आणि पती सैफनेही करीना कपूर खानशी संबंधित अनेक छुप्या गोष्टी सांगितल्या.

Kareena Kapoor's Many Secrets Revealed, This Was The Actress's Reaction When She Saw Saif Shirtless For The First Time | करीना कपूरचे बरेच सीक्रेट्स आले समोर, सैफला पहिल्यांदा शर्टलेस पाहिले तेव्हा अभिनेत्रीची होती ही रिअ‍ॅक्शन

करीना कपूरचे बरेच सीक्रेट्स आले समोर, सैफला पहिल्यांदा शर्टलेस पाहिले तेव्हा अभिनेत्रीची होती ही रिअ‍ॅक्शन

अलीकडेच खऱ्या आयुष्यातील आई-लेक जोडी शर्मिला टॅगोर आणि सैफ अली खान करण जोहरच्या लोकप्रिय शो कॉफी विथ करणमध्ये दिसले. या शोमध्ये दोघांनीही करण जोहरच्या मनमोकळ्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. इथे आपल्याला आई आणि मुलाच्या नात्याची माहिती मिळाली. तसेच करीना कपूर खानशी संबंधित सर्व गुपितेही समोर आली आहेत. हे सीक्रेट केवळ सैफ आणि शर्मिला यांनीच नव्हे तर खुद्द करीना कपूर खानने देखील उघड केले होते.

कॉफी विथ करण शोच्या 'एव्ही सेशन' या सत्रादरम्यान करीना कपूर खानचा एक सरप्राईज व्हिडिओ प्ले झाला होता. येथे करिनाने त्या काळाबद्दल सांगितले जेव्हा ती करीना कपूर होती. करीना कपूरपासून ती करीना कपूर खान कशी झाली हे तिने सांगितले. दोघांच्या नात्याच्या सुरुवातीबद्दल करीनाने एक अतिशय मजेशीर गोष्ट सांगितली. करिनाने सांगितले की, जेव्हा ती सैफला पहिल्यांदा भेटली तेव्हा लडाखमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. व्हॅनिटी व्हॅनच्या छतावर कोणीतरी शर्टशिवाय बसलेले मी पाहिले. मी विचारले की तो कोण आहे जो असा बसला आहे आणि मला सांगण्यात आले की तो सैफ आहे. त्यानंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो.

सैफने करीनाबद्दल काय सांगितले?
सैफने सांगितले की, जेव्हा त्याचे आणि करिनाचे भांडण होते तेव्हा तिला शांत करण्यासाठी मला माफी मागावी लागते आणि प्रेमाने वागावे लागते. यानंतर त्याने सांगितले की, करीना इतकी काळजी घेणारी आहे की ती मला व्यायाम, आरोग्य आणि आहार यासारख्या गोष्टींबद्दल सांगते.

सासू शर्मिला काय म्हणाल्या?
शर्मिलाने सांगितले की, जेव्हा मी करीनाला दिल्लीत पहिल्यांदा भेटले तेव्हा मला तिचा स्पष्टवक्तेपणा आवडला. ती खूप सहज स्वभावाची आहे. तेथे बरेच लोक उपस्थित होते आणि करीनाने बिनदिक्कत सर्वांसमोर सांगितले की ती आणि सैफ एकत्र आहेत. शर्मिला म्हणाल्या की, आमच्या काळात हे करणे कठीण होते. सैफचे वडील टायगर आजारी होते आणि जेव्हा त्यांचे निधन झाले, तेव्हा या संपूर्ण काळात करीना त्यांच्यासोबत होती.

Web Title: Kareena Kapoor's Many Secrets Revealed, This Was The Actress's Reaction When She Saw Saif Shirtless For The First Time