मावशी करिष्मा कपूरच्या घरी मस्ती करताना दिसला करिनाचा लाडका तैमूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2017 20:05 IST2017-05-28T14:35:28+5:302017-05-28T20:05:28+5:30

जन्मताच अभिनेत्री करिना कपूर-खान अन् सैफ अली खान यांच्या छोट्या नवाबाने लोकांचे लक्ष त्याच्याकडे आकर्षित केले होते. कारण जन्मापासूनच ...

Kareena Kapoor's love for Karishma Kapoor's house was fun! | मावशी करिष्मा कपूरच्या घरी मस्ती करताना दिसला करिनाचा लाडका तैमूर!

मावशी करिष्मा कपूरच्या घरी मस्ती करताना दिसला करिनाचा लाडका तैमूर!

्मताच अभिनेत्री करिना कपूर-खान अन् सैफ अली खान यांच्या छोट्या नवाबाने लोकांचे लक्ष त्याच्याकडे आकर्षित केले होते. कारण जन्मापासूनच सैफचा लाडका तैमूर चर्चेत आहे. सुरुवातीला नावावरून तो चर्चेत होता, तर नंतर सोशल मीडियावरील त्याच्या फोटोवर तो चर्चेत आला होता. सध्या तैमूर मावशी करिष्मा कपूर हिच्या घरी एन्जॉय करीत असून, त्याचे काही फोटोज समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच तैमूर आजी बबिता हिच्या घरी स्पॉट झाला होता. यावेळी तैमूरसोबत मम्मी करिना, करिष्मा, रणधीर कपूर आणि त्याचे चुलतभाऊ उपस्थित होते. 

दरम्यान, करिष्मा कपूरच्या घरातील तैमूरचे फोटोज् खूपच क्यूट असून, यामध्ये तो मस्ती करताना बघावयास मिळत आहे. फोटोमध्ये तैमूरने टी-शर्ट आणि नारंगी रंगाचे शॉटर््स घातलेले आहेत. तैमूरला त्याच्या दाईने कडेवर घेतलेले आहे. फोटोत तैमूर मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहे. सध्या तैमूर खूपच खोडकर झाल्याने खान-कपूर परिवारात आनंदाचे वातावरण आहे. शिवाय तैमूरने परिवारातील सर्वांनाच लळा लावला आहे. 



तर करिनाविषयी बोलायचे झाल्यास सध्या ती तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. नुकतीच रिया कपूरने या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाच्या शूटिंगला आॅगस्टमध्ये सुरुवात केली जाणार आहे. वास्तविक या चित्रपटाचे शूटिंग गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातच सुरू केली जाणार होती, परंतु करिनाच्या प्रेग्नेंसीमुळे शूटिंग शेड्यूल्ड पुढे ढकलण्यात आले होते. 

Web Title: Kareena Kapoor's love for Karishma Kapoor's house was fun!