करीना कपूरच्या 'गुड न्यूज'वर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 20:01 IST2020-08-12T20:00:46+5:302020-08-12T20:01:07+5:30

करिना कपूर पुन्हा एकदा आई होणार आहे. सोशल मीडियावर या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचसोबत बरेच मीम्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Kareena Kapoor's 'Good News' showers memes on social media, you too will be blown away | करीना कपूरच्या 'गुड न्यूज'वर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

करीना कपूरच्या 'गुड न्यूज'वर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. करिना कपूर पुन्हा एकदा आई होणार आहे. सोशल मीडियावर या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचसोबत बरेच मीम्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

करीना कपूर व सैफ अली खानचा लाडका छोटा नवाब तैमूर बालपणापासूनच लोकप्रिय आहे. त्यामुळे तैमूर बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेत येत असतो. त्यात आता आपल्या घरी नवीन पाहुणा येणार हे जाणून तैमुरची प्रतिक्रिया कशी असेल, यावरून सोशल मीडियावर बरेच मीम्स व्हायरल झाले आहेत.

तर करीनाची गोड बातमी ऐकल्यानंतर अनुष्का शर्माची विराटसाठी प्रतिक्रिया काय असेल यावरूनही भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

तैमुर आता 3 वर्षांचा झाला आहे. दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी कुटुंबीय उत्सुक आहेत. आतापर्यंत ही गुडन्युज फक्त करिना आणि सैफच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना माहिती होती. मात्र आता करिना आणि सैफने अधिकृत स्टेटमेंट जारी करत ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.

करिना किती महिन्याची प्रेग्नेंट आहे याची माहिती अजून मिळालेली नाही.

Web Title: Kareena Kapoor's 'Good News' showers memes on social media, you too will be blown away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.