टाइट ड्रेसमध्ये बेबी बंपसोबत दिसली करीना कपूर, प्रेग्नेंसीमध्ये अशी ठेवतेय स्वतःला बिझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 21:20 IST2020-11-03T21:19:49+5:302020-11-03T21:20:19+5:30

अभिनेत्री करीना कपूर सध्या प्रेग्नेंसी एन्जॉय करते आहे.

Kareena Kapoor in tight dress with baby bump, keeps herself busy in pregnancy | टाइट ड्रेसमध्ये बेबी बंपसोबत दिसली करीना कपूर, प्रेग्नेंसीमध्ये अशी ठेवतेय स्वतःला बिझी

टाइट ड्रेसमध्ये बेबी बंपसोबत दिसली करीना कपूर, प्रेग्नेंसीमध्ये अशी ठेवतेय स्वतःला बिझी

बॉलिवूडची बेबो म्हणजे अभिनेत्री करीना कपूर सध्या प्रेग्नेंसी एन्जॉय करते आहे. करीनाचा प्रेग्नेंसीचा सहावा महिना चालू असून आता बेबी बंप दिसतो आहे. या दरम्यान घरी आराम करण्याऐवजी ती कामात बिझी आहे. काही दिवसांपूर्वी ती आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढाचे शूटिंग पूर्ण करून मुंबईला परतली आहे. मुंबईत आल्यानंतर तिने एका जाहिरातीचे शूटिंगदेखील केली आहे. नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत करीना कपूर खूप टाइट शिमरी ड्रेसमध्ये दिसते आहे. यात तिचे बेबी बंप दिसतो आहे. यासोबतच तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लोदेखील पहायला मिळतो आहे.


करीनाने नुकतेच मुलगा तैमूरसाठी घरी हॅलोविन पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी तैमूरचे मित्रदेखील उपस्थित होते. करीनाने या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तैमूरने आपल्या चेहऱ्यावर लाल रंग लावला आहे आणि एक ब्लॅक आउटफिट परिधान केले आहे. तैमूरचे फ्रेंडदेखील हेलोविन लूकमध्ये दिसत आहेत.

करीनानेदेखील या पार्टीतील तिचे फोटो शेअर केले आहेत. यादरम्यान करीनाने जो ड्रेस परिधान केला आहे त्यात तिचा बेबी बंप स्पष्ट दिसतो आहे. करीनासोबत तैमूरच्या फ्रेंड्सच्या मम्मीदेखील दिसत आहेत.


काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत करीना कपूरने सांगितले होते की अशी कोणती गोष्ट आहे जी दुसऱ्या प्रेग्नेंसीमध्ये करायची नाही.

करीनाने सांगितले की, तैमूरच्या वेळी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा सगळे मला खूप काही खायला सांगत होते आणि त्यामुळे माझे वजन २५ किलो वाढले होते. ते आता मला पुन्हा करायचे नाही. मला हेल्दी आणि फिट रहायचे आहे. 

Web Title: Kareena Kapoor in tight dress with baby bump, keeps herself busy in pregnancy